दहावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी, 10 वी पास असाल तर आजच करा अर्ज

दहावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी, 10 वी पास असाल तर आजच करा अर्ज

10 वी उत्तीर्ण असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. महावितरणमध्ये एकूण 99 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या जागांबाबतचे नोटिफिकेशन कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यात एकूण पदे, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार online पद्धतीने आपले अर्ज सादर करु शकतात. ही भरती फक्त पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून उत्तीर्ण (भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापुर तालुक्यातील) येथील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांकरिता आहे.

दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच उमेदवारांनी पदांनुसार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. वीजतंत्री / तारतंत्री या शाखेतून दोन वर्ष कालावधीचा ITI उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याच शेवटची तारीख 21 मार्च 2023 ही असणार आहे. अर्जाची नोंदणी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर करता येणार आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, भिगवन रोड, बारामती या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.

मुलीच्या लग्नाचं वय १८ ऐवजी २१ होणार, ‘इतक्या’ वर्षांनी कायदा होणार लागू

पदभरतीसाठी दहावी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वीजतंत्री-तारतंत्री उत्तीर्ण गुणपत्रक, आधारकार्ड, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), तहसीलदार यांचे रहिवाशी प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यात सरकारी नियमानुसार सवलत देण्यात आली आहे. याचा सविस्तर तपशील जाहिरातीत देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास संबंधित अर्ज हे बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

एकूण पदे – 99

पदाचे नाव-
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
शाखा – वीजतंत्री

शैक्षणिक अहर्ता–
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयीत आयटीयाय पुर्ण करणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 30 तर मागासवर्गीय उमेदवारांनासाटी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क –
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतेही फी आकारले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण – बारामती

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1EFYS8rweByDpFucYGrsoaCQzhMT62Yft/view

●  अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 मार्च 2023
●  या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube