सिलेंडरचा तुटवडा ! गॅस बचतीच्या सोप्या टिप्स जाणून घ्या…

LPG Cylinder Shortage- गृहिणींनो तुमच्याकडे भरलेला गॅस सिलिंडर असेल तर तो जास्त दिवस कसा जाईल, याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया...

  • Written By: Published:
Lpg Gas

LPG Cylinder Shortage : इस्रायल-इराण युद्धाचा (Iran-Israel war) थेट परिणाम गॅस पुरवठावर झाला आहे. आपल्याकडे एलपीजी, सीएनजी गॅसची (LPG Cylinder Shortage) टंचाई निर्माण झाली आहे. गॅसवर अनेक पर्याय शोधले आहेत. विजेवरील इंडक्शन , ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. गृहिणींनो तुमच्याकडे भरलेला गॅस सिलिंडर असेल तर तो जास्त दिवस कसा जाईल, याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया…



मंद आचेवर स्वयंपाक करा

यात इंडियन ऑईलने काही टिप्स दिल्या आहेत. भाजीला, दुधाला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा. कारण उकळी आल्यानंतर जास्त उष्णता राखल्याने स्वयंपाक जलत होत नाही. तो फक्त जास्त गॅस वापरतो.

कमी उष्णता वापरल्याने, कोणताही अतिरिक्त वेळ वाया जात नाही. त्यामुळे 25 टक्के गॅसची बचत होते.

प्रेशर कुकरचा वापर करा

डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी प्रेशर कुकर सर्वात उत्तम आहे. त्यामुळे 30-50 टक्के वेळ आणि गॅस वाचतो.

झाकण ठेवून शिजवणे

भांडी उघडी न ठेवता त्यावर झाकण ठेवा. यामुळे वाफ आत राहते आणि पदार्थ लवकर शिजतात.


पदार्थ शिजविण्यापूर्वी भिजवणे

कडधान्ये, डाळी किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा ते एक तास भिजवल्यास ते लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते.


बर्नर स्वच्छ ठेवणे

गॅसचे बर्नर निळे आणि स्वच्छ ठेवा. जर ज्योत पिवळी दिसत असेल, तर बर्नर साफ करण्याची गरज आहे.


योग्य भांड्यांचा वापर

बर्नरच्या आकाराएवढीच भांडी वापरा. लहान भांड्यासाठी मोठा बर्नर वापरल्यास गॅस वाया जातो.


पूर्व तयारी

भाजी कापून, मसाले काढून असे सर्व साहित्य जवळ ठेवूनच गॅस पेटवा. यामुळे गॅस विनाकारण जळत राहत नाही.


फ्रीजमधील पदार्थ

फ्रिजमधून काढलेले अन्न किंवा पाणी लगेच गरम करू नका, ते थोडा वेळ बाहेर ठेवून सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा.

follow us