Breaking! आजपासून एकच व्हॉट्सअप चार फोनमध्ये लॉग इन होणार

Breaking! आजपासून एकच व्हॉट्सअप चार फोनमध्ये लॉग इन होणार

व्हॉट्सअप युजर्ससाठी एक आनंदाची समोर आली आहे. आजपासून युजर एकच व्हॉट्सअप चार स्मार्टफोनमध्ये लॉग इन करु शकणार आहेत. यासंदर्भात मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंवटवरु पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

आमचा ‘आँख मिचौली’शी काही संबंध नाही; अजिदादांच्या प्रश्नावर सत्तारांचे मिश्किल उत्तर

आजपासून, तुम्ही एकाच व्हॉट्सअप अकाऊंटमध्ये चार फोनवर लॉग इन करू शकता,” मार्क झुकरबर्गने यांनी ही घोषणा केली आहे. मल्टी-डिव्हाइस म्हणून ओळखले जाणारे हे फिचर्स अनेक काळापासून उपलब्ध होतं. ते युजरला त्यांच्या फोनच्या बाजूने ब्राउझर, कॉम्पुटर किंवा Android टॅब्लेटवरून WhatsApp ऍक्सेस करण्याची परवानगी देते.

मानपानावरून वर पक्ष – वधू पक्षात जोरदार हाणामारी, १०-१२ जण हॉस्पिटलमध्ये भरती, पैठणमधील घटना

आता युजर आपल्या इतर फोनमध्ये लॉग इन करु शकणार आहेत.मात्र, चारपेक्षा अधिक फोनमध्ये व्हॉट्सअप खातं लॉग इन करु शकणार नाहीत.एक WhatsApp खाते, आता अनेक फोनवर, जे आधीपासूनच जगभरातील युजरसाठी उपलब्ध होत आहे आणि येत्या आठवड्यात सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचं व्हॉटस्अॅपने स्पष्ट केलं होतं.

जे व्हॉट्सअप युजर एक वगळता इतर फोन वापरतात आणि त्या सर्वांना एकच WhatsApp खाते हवे आहे. त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार असून WhatsApp लहान व्यवसायांसाठी हे एक विशेष फिचर असणार आहे. ज्यामुळे एकाधिक कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या फोनवर एकाच व्यवसाय क्रमांकावरून संदेश पाठवता आणि प्राप्त करता येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube