Netflix Sharing Option : तुम्हीही पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन वापरता? जाणून घ्या नव्या अटी
Netflix Sharing Option : गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू केलं होतं. त्यानुसार नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध लागू करण्यात आले होते. हे फिचर आज 20 जुलै 2023 पासून भारतातील युझर्ससाठी देखील लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनचा पासवर्ड घरातील लोकांव्यातिरिक्त इतरांना शेअर नाही करू शकणार. तसेच कंपना त्यात काही आणखी नियम घालून दिले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊ… ( Netflix Sharing Option in India can’t Share Password )
Irshalwadi Landslide : दरड का कोसळली? वाचा तज्ज्ञांचे प्राथमिक विश्लेषण
का घेतला निर्णय?
एका सब्सक्रिप्शनचा पासवर्ड शेअर करत अनेक जण वापर करत असल्याने नेटफ्लिक्सला जागतिक पातळीवर नुकसान सहन करावं लागत होत. त्यामुळे अनेक देशांमध्ये नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू केलं. तसेच आता भारतात देखील हे फिचर लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनचा पासवर्ड घरातील लोकांव्यातिरिक्त इतरांना शेअर नाही करू शकणार. तसेच नेटफ्लिक्सने त्यांच्या युझर्सना यासंदर्भात मेल करायला सुरू केले आहेत. जे घरातील सदस्यांव्यातिरिक्त इतरांना पासवर्ड शेअर करत आहेत.
मुंबईतली धो-धो पावसात वाहून गेलेली तान्हुली सापडली? व्हायरल फोटोमागचं सत्य समोर
काय आहेत नव्या अटी?
नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू केल्यानंतर काही अटी गातल्या आहेत त्यानुसार आता तुम्ही तुमच्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रिप्शनचा पासवर्ड घरातील लोकांनाच शेअर करता येणार. मात्र काही मित्रांनी एकत्र सब्स्क्रिप्शन घेतलं आहे. ते आता पासवर्ड शेअर नाही करू शकणार. तसेच तुम्हाला घरातील सदस्यांव्यातिरिक्त इतरांना पासवर्ड शेअर कारायचा असेल तर वेगळे पैसे आकारले जाणार आहेत.
या देशांमध्ये शेअरिंग ऑप्शन बंद
नेटफ्लिक्सने जगभरातील 100 देशांमध्ये मे महिन्यातच हा नियम लागू केला होता. तर आता भारतात देखील नेटफ्लिक्सने शेअरिंग फिचर लागू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये युनाइटेड स्टेट, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, आस्ट्रिया, सिंगापुर, मॅक्सिको, ब्राझिलमध्ये नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध लागू करण्यात आले. नेटफ्लिक्सचे जगभरात जवळपास 6 मिलीयन सब्सक्रायबर्स आहेत.