मुंबईतली धो-धो पावसात वाहून गेलेली तान्हुली सापडली? व्हायरल फोटोमागचं सत्य समोर

मुंबईतली धो-धो पावसात वाहून गेलेली तान्हुली सापडली? व्हायरल फोटोमागचं सत्य समोर

Mumbai Rain :  मुसळधार पावसामुळे काल (19 जुलै)  मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना  आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना त्यांचा पाय अडखळला आणि हे बाळ थेट वाहत्या नाल्यात पडले.

रिषिका रुमाले असे या तान्ह्या मुलीचे नाव आहे. यानंतर अग्निशमन दल, आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी यांनी बाळाचा शोध सुरु केला. दरम्यान, संध्याकाळी बाळ सापडल्याची बातमी पसरली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले. बाळ सापडल्याने सर्वांना आनंद झाला. मात्र सदर फोटो हे ठाकुर्लीतील घटनेचे नसल्याचे उघड झाले असून अद्यापही मुलीचा शोध सुरु आहे.

Irshalgad Landslide : इर्शाळवाडी घटनेने जागवल्या माळीण अन् तळीयेच्या भयावह आठवणी

काय घटना घडली?

हैदराबादच्या योगिता रुमाले या भिवंडी धामणगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे प्रसुतीसाठी आल्या होत्या. रिशिका हिच्यावर जन्मापासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. नेहमीप्रमाणे योगिता आपल्या वडिलांसह बुधवारी सकाळी मुलीला घेऊन तपासणीसाठी गेली होती. दुपारी काम संपवून ते कल्याण-अंबरनाथ लोकलने निघाले. पुढे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकलचा कोळंबा झाला, नंतर अनेकांनी गाडीतून उतरून पायी चालण्याचा  निर्णय घेतला. पुढे चालत असताना बाळाच्या आजोबांचा पाय रुळामध्ये अडखळला व बाळ नाल्यात पडले.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

नाल्याचे पात्र मोठे असल्याने आणि पाण्याला वेग असल्याने बाळ वाहून गेले आहे.  सध्या रेल्वे पोलीस आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने बाळाचा शोध सुरु आहे. काल (19 जुलै) दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेनंतर संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपस्थित एका प्रवाश्याने या घटनेचा व्हिडीओ शूट करुन तो सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. यात ही माता आक्रोश करताना दिसून येत असून तिचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube