आता व्ह़ॉट्सअप ग्रुपमधील दुसऱ्याचा नंबर कुणी पाहू शकत नाही, कारण…

आता व्ह़ॉट्सअप ग्रुपमधील दुसऱ्याचा नंबर कुणी पाहू शकत नाही, कारण…

आता व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर सदस्यांना एकमेकांचे नंबर पाहता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअपकडून नवीन फिचर लॉन्च करण्यात आलं आहे. या फिचरद्वारे युजर्सला आपला नंबर लपवता येणार आहे. म्हणजेत ग्रुपमधील कोणी तुमचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे.

48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव

या फिचरद्वारे आपण जर स्वत:चा नंबर लपवून ठेवला तर त्या युजर्सलाही दुसऱ्या कोणाचा नंबर पाहता येणार नाहीये, अशा युजर्सला जर कोणाचा नंबर पाहायचा असेल तर त्याला एक विनंती पाठवावी लागणार आहे, ज्या व्यक्तीचा नंबर हवा आहे, त्या व्यक्तीने जर विनंती स्वीकारली तरच तुम्हाला त्याचा संपर्क क्रमांक पाहता येणार आहे.

पहिल्यांदा एकत्र दिसणार जॉनी अन् जेमी लिव्हर या बाप-लेकीची जोडी

व्हॉट्सअप युजर्सच्या सुरक्षेची दखल कंपनीकडून घेण्यात आली असून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडलेल्या सर्वच सदस्यांना सध्या कोणाचाही नंबर पाहता येत आहे. अशावेळी ग्रुपमधील इतर सदस्यांकडून आपल्या नंबरचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता असते. एवढंच नाहीतर इतर सदस्यांनी नंबर घेतल्यानंतर फोन, मेसेज करुन त्रास देण्याची शक्यता असते. नंबरचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी याआधी आलेल्या आहेत. त्यामुळेच कंपनीकडून युजर्सची ही समस्या दूर करण्यासाठी हे फिचर कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे आगामी फीचर Android आवृत्ती 2.23.14.19 आणि iOS आवृत्ती 23.14.0.70 च्या बीटा आवृत्तीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनी लवकरच सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप कॉन्टॅक्ट हाईड फीचर आणण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube