NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, राज्यातील 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्थाचे पूर्ण

NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, राज्यातील 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्थाचे पूर्ण

पुणे : राज्यातील प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्च शिक्षण विभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. अधिकाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमार्फत मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) च्या आकडेवारीनुसार, राज्यातील 35 विद्यापीठे आणि 1,922 महाविद्यालये, अशा एकूण 1,957 उच्च शिक्षण संस्थांनी NACC मूल्यांकन पूर्ण केले आहे. (One thousand 957 institutions participating in NAAC evaluation)

दर्जेदार उच्च शिक्षणासाठी, विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांना NAAC मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन पूर्ण करणे अनिवार्य आहे. NAAC मूल्यांकन श्रेणीवरून एखाद्या शैक्षणिक संस्थेचा दर्जा लक्षात येतो. मात्र, मूल्यमापनाच्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, उच्च शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेण्यासाठी वारंवार पत्रे पाठवली आहेत.

शरद पवार अन् अजितदादांच्या गुप्त भेटीत काय खलबतं? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नेमकं कारण 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. NAAC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या मे 2023 च्या आकडेवारीनुसार, NAAC द्वारे मूल्यांकन केलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1,957 संस्था आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटकातील 1 हजार 28 शैक्षणिक संस्थांचे NAAC मूल्यांकन केले आहे. तर त्यामुळे तामिळनाडूतील 904 संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

‘नॅक’ द्वारे मूल्यांकन केलेल्या शैक्षणिक संस्थांची आकडेवारी
राज्य :           विद्यापीठ :          महाविद्यालय :         एकूण
महाराष्ट्र :             35                  1,922                  1,957
गुजरात :             27                   500                       527
कर्नाटक :           34                   994                     1028
तामिळनाडू :       45                   859                      904
उत्तर प्रदेश :       39                   617                        656
पश्चिम बंगाल :     17                   411                        428

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितले की, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील उच्च शैक्षणिक संस्थांचे नॅक मूल्यांकन झाले पाहिजे, यासाठी शासनस्तरावरून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबवणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे आदी पावले उच्च शिक्षण विभागाकडून उचलण्यात आली. परिणामी, राज्यातील अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी NACC असेसमेंट घेतले आहे आणि त्यामुळे या मुल्यांकनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube