10 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 30 हजार पदांची मेगा भरती, 29,380 रुपये प्रति महिना

10 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 30 हजार पदांची मेगा भरती,  29,380 रुपये प्रति महिना

Indian Department of Post recruitment : अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असतात, तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) देशातील विविध मंडळांमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर बंपर भरती करणार आहे. सर्व विभागांमध्ये एकूण 30,041 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्य़ात आले आहेत. या पद भरतीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज करण्याला सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइटद्वारे उमेदवारांनी दि. 23 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. (opportunity for 10th passed mega recruitment of 30 thousand posts in post Department)

या अधिसूचनेत पोस्टल विभाग भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखांविषयी माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना काही चूक झाल्यास अर्ज रद्द केला जाईल हे लक्षात ठेवा.

एकूण पदे – 30,041

पदांची नावे
शाखा पोस्ट मास्टर
सहायक शाखा पोस्ट मास्टर
डाकसेवक

कुठे होणार पदांची भरती?
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम इ.

शैक्षणिक पात्रता-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या भारत सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील कोणत्याही मान्यताप्रापत् शालेय मंडळद्वारे उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शाळेत असताना गणित, इंग्रजी यासह स्थानिक भाषांचा अभ्यास आवश्यक आहे.
संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे
सायकल चालवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

‘आता मंत्रिमंडळ विस्ताराचाही काहीच फायदा नाही’; बच्चू कडूंनी दिलं सांगितलं तोट्याचं गणित 

वयोमर्यादा-
या पदभरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे.
SC/ST उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट मिळेल. इतर मागासवर्गीयांना 3 वर्षांची सूट मिळेल.

शुल्क-
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100
SC, ST, दिव्यांग, महिलांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड प्रक्रिया-
कोणतीही लेखी परीक्षा नाही.
10 तील गुणांच्या आधारे निवड
सादर केलेल्या अर्जांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्यांना प्राधान्य नाही.

पगार-
शाखा पोस्ट मास्टर – 12,000 रुपये ते 29,380 रुपये प्रति महिना
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर – 10,000 रुपये ते 24,470 रुपये प्रति महिना

अर्जाची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख– 23 ऑगस्ट

अर्ज कसा करायचा?
ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
सर्वात आधी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करा.
उर्वरित अर्ज भरा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube