श्रावण नेमका कधी! शिवपूजन, व्रत-वैकल्य कधी करायची? वाचा दाते पंचागकर्ते काय म्हणतात

श्रावण नेमका कधी! शिवपूजन, व्रत-वैकल्य कधी करायची? वाचा दाते पंचागकर्ते काय म्हणतात

Shravan 2023 : हिंदू पंचागामध्ये येणारा पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये हिंदूंकडून अनेक व्रत-वैकल्य केली जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन असे महत्त्वाचे सण असतात. या महिन्यात मांसाहारही टाळला जातो. विशेषतः श्रावणातील सोमवारी शिवभक्तांकडून शिवपूजन आणि उपवास केला जातो. यावर्षी मात्र अधिक श्रावण महिना आल्याने मूळ श्रावण महिना नेमका कधी सुरू होतो? श्रावणातील व्रत-वैकल्य कधी करायची? हे व असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ दाते पंचागकर्ते मोहन दाते यांच्याकडून… ( Panchang Maker Mohan Date Explain about Shravan month and Aadhik month Confusion Hindu Calendar )

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिमटे अन् हशा, शिंदेच्या पॉजवर अजितदादांना जयंत पाटलांचा चिमटा

यंदा अधिक श्रावण आल्याने या वर्षी श्रावणातील आठ सोमवार करायचे का? दोन महिने शिवपूजन करायचा का ? असा संभ्रम लोकांमध्ये आहेत. त्याबाबत दाते म्हणतात, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागामध्ये असा वेगळा श्रावण महिना नाही. त्यामुळे मंगळागौर, श्रावणी सोमवारी, शिवपूजन या गोष्टी पुढच्या येणाऱ्या श्रावण (नीज श्रावण) महिन्यात करायच्या असल्याचे दाते म्हणाले.

महाराष्ट्रात शुद्ध, निज श्रावणातील चार सोमवार करायचे आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी भागात नेहमीप्रमाणे पुढचा महिना श्रावण आहे. 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत अधिक श्रावण मास आहे, नंतर 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर श्रावण महिना आहे. नेहमीचा श्रावण महिना आहे. त्यावेळी शिवपूजन, मंगळागौरी व इतर सण करायचे असल्याचं स्वतः दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचं श्रावण महिन्याबाबतचा गोंधळ दूर होण्यास मदत होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube