रमजान स्पेशल चमचमीत खाद्य भ्रमंती..

  • Written By: Published:
रमजान स्पेशल चमचमीत खाद्य भ्रमंती..

संपत मोरे (प्रतिनिधी)
Ramzan Special Chaat : आज जगभरातले मुस्लीम रमजान ईद साजरी करत आहेत .ईदचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ. तिखट खमंग पदार्थ मन तृप्त करतात. तर गोड पदार्थ मनाला सुखावतात. रमजान महिन्यात विविध पदार्थांची मेजवानी आम्ही आपल्याला पुण्यातील कोंढवा भागातील कौसरपागा या प्रसिद्ध ठिकाणच्या रमजान खाद्य पदार्थ जत्रेची ओळख करून देत आहोत.

पुण्यातील कोंढवा येथील कैसरबाग हे ठिकाण रमजान महिन्यात रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधव यांच्या करता खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रमजान महिन्यातील तिखट गोड चमचमीत पदार्थांचे प्रकार या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात. आणि याचाच आस्वाद घेण्यासाठी अगदी अबाल वृद्धापासून सगळेच या ठिकाणी येतात .भल्या पहाटे सहरीला भोजनानंतर त्यांचा सुरू झालेला मुस्लिम बांधवांचा उपवास संध्याकाळी इफ्तारला सोडला जातो. आता अगदी पाण्याचा एक थेंबही न घेता केलेला उपवास असताना शहरी आणि इफ्तारला विविध खाद्यपदार्थांची रेल असेल तर असणारच ना..! म्हणूनच की काय रमजान महिन्यात येथे वेगळे खाद्यसंस्कृती त्यानिमित्ताने अनुभवायला मिळते. रमजानच्या महिन्यामध्ये रोज रात्री या खाद्य जत्रेत सर्वच मुस्लिम बांधव आपापल्या आवडीचे पदार्थ खरेदी करण्यास एकच गर्दी करतात.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार…  

खजूर ,फ्रुट सलाड ,व्हेज नॉनव्हेज स्टार्टर इत्यादी पदार्थ खाऊन संध्याकाळी रोजा सोडला जातो. तसेच रात्रीच्या साडे आठ च्या नमाजी नंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत चमचमीत मांसाहारी पदार्थ यांची मेजवानी असते. रमजानच्या या पदार्थांमध्ये जवळजवळ दिडशे प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी अनुभवास मिळतो. पुणे शहरातील विविध भागातून तसेच ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव आवर्जून या ठिकाणी रमजानच्या पदार्थांचे खरेदी करण्यासाठी येत असतात.

भावना गवळी अन हेमंत पाटलांच वाढलं टेन्शन.. ‘या’ माजी खासदाराने निवडणूक लढवण्याची केली घोषणा

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पुण्यात हैदराबादी नववी पदार्थाची चव नागरिकांना अनुभवास मिळाली आहे तो पदार्थ म्हणजे पत्थरघोष.हा पदार्थ तयार करण्यासाठी एक प्रकारचा वेगळ्या प्रकारच्या दगडावर शिजवला जातो .हा दगड दुबई सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असतो आणि याची किंमत साधारण लाख भरायच्या आसपास आहे .असे एका हॉटेल व्यवसायिक हसीना इनामदार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लाकडाच्या दूमस च्या सहाय्याने तयार केलेल्या मटण आणि चिकन या पासून तयार केलेला हलीम पदर्थास वेगळीच चव आहे. तसेच मालपोव्हा, तवा घोष, काश्मीर कबाप पासून ते मटन आणि चिकन तंदूर चे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची कोर्टात बिनशर्त माफी

महिनाभर सुरू असलेल्या या खाद्य भ्रमंतीची सांगता ईद च्या शिरखुर्मा सोबत होते. या रमजान महिन्यातील खाद्य संस्कृतीचा पगडा इतका आहे की या महिन्यात प्रांतीय ,जातीय,धार्मिक असले कुठलेही भेद या रमजान विशेष खाद्यपदार्थात आडवे येत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube