ठाणे महानगरपालिकेत ‘या’ पदांची बंपर भरती, महिन्याला मिळणार 76 हजार 587 रुपये पगार

ठाणे महानगरपालिकेत ‘या’ पदांची बंपर भरती, महिन्याला मिळणार 76 हजार 587 रुपये पगार

Thane Municipal Corporation Recruitment 2023 : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फार कठीण काम झाले आहे. कारण देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हीही बेरोजगार असाल आणि नोकरी (job) मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ठाणे महापालिकेत (Thane Municipal Corporation) काम करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ठाणे महानगरपालिकेने कनिष्ठ निवासी (Junior Resident) पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरतीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
(Thane Municipal Corporation Recruitment For Junior Resident post 116 vacancy)

या भरतीअंतर्गत 116 जागा भरण्यात येणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेमध्ये कनिष्ठ निवासी पदासाठी 179 दिवसांच्या कालावधीसाठी एकत्रित वेतनावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 03 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

अपूर्ण असलेले अर्ज तपासणी समीती यांचे मार्फत रद्द ठरवण्यात येतील. अर्जा सोबत M.M.C/M.S.D.C चे वैध प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही.

एकूण पदांची संख्या – 116

पदाचे नाव – कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता
एम. डी. पदवीधर पदवी.
डी.एन. बी. पदवीधर पदवी.
डिप्लोमा.
FCPs
एमबीबीएस पदवी

दंतचिकित्सा-
बीडीएस पदवी (एक वर्षाचा अनुभव)

चर्चा तर होणारच! ‘एमआयडीसी’चं जॅकेट का घातलं? रोहित पवारांच्या उत्तराने उद्योगमंत्र्यांनाच घेरलं 

नोकरीचे ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता –
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे.
मुलाखतीची तारीख – 3 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट – thanecity.gov.in

वेतन –
कनिष्ठ निवासी पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार 144 रुपये ते 76 हजार 587 रुपये इतके वेतन मिळेल.

आवश्यक कागदपत्रे-
छायाचित्र, 10वी-12वी प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, जात प्रणापपत्र, रहिवासी पुरावा, अनुभव प्रमाणपत्र इ.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1yHa6hKtjI9V7iTtL-hR8rv49DgQxlo_T/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube