कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार

ईपीएफओ सदस्य हे वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करत होते.

News Photo   2026 07 08T160441.848

EPFO ने PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती जाहीर केली. (PF) विशेष म्हणजे सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहात होते, अखेर ती घोषणा झाली आहे. EPFO ​​ने जाहीर केले आहे की, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत 34 कोटी खात्यांमध्ये तब्बल 8.25 टक्के व्याज जमा केले जाईल, ही मोठी घोषणा मानली जात आहे.

ही एकूण रक्कम सुमारे 1.44 लाख कोटी रुपये इतकी आहे. थेट फायदाच फायदा होणार आहे. 15 जुलैपर्यंत ही रक्कम जमा होईल. याच घोषणेची कित्येक दिवसांपासून वाट बघितली जात होती. यासोबतच पीएफ संबंधित सेवा आता अधिक फास्ट आणि सोयीस्कर होणार आहेत. नवीन केंद्रीकृत आयटी प्रणालीची अंमलबजावणी करणे हा एक महत्त्वाचा बदल आहे. ज्यामुळे तुम्हाला एकदम वेगवान सर्व्हिस मिळणार आहे.

सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत?; CRISIL ने उलगडले गोल्ड लोनचे संपूर्ण गणित

या प्रणालीमुळे देशभरातील पीएफ खात्यांची माहिती एकाच केंद्रीकृत डेटाबेसमध्ये एकत्रित केली जाईल, ज्यामुळे सदस्यांना कोणत्याही ईपीएफओतून सेवांचा लाभ घेता येईल. ईपीएफओ सदस्य हे वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करत होते. या वर्षी मार्च महिन्यात ईपीएफओच्या मंडळाने 8 कोटींहून अधिक सदस्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 8.25 टक्के व्याजदाराला मंजुरी दिली होती.

सलग तिसऱ्या वर्षी व्याजदर कायम ठेवला आहे. ईपीएफओकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने जूनमध्ये व्याजदराला मंजुरी दिली होती. तुमच्या ईपीएफ खात्यात शिल्लक रक्कम अनेक मार्गांनी तपासू शकता. तुमचा UAN आणि मोबाईल नंबर ईपीएफओकडे नोंदणीकृत असेल, तर तुम्ही फक्त एक एसएमएस पाठवून तुमच्या खात्याची माहिती जाणून घेऊ शकता. तसेच तुम्ही उमंग अॅप, ईपीएफओ पोर्टल आणि मिस्ड कॉलद्वारे देखील रक्कम जाणून घेऊ शकता.

follow us