जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; किंमत वाचून धक्का बसेल

  • Written By: Published:
जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; किंमत वाचून धक्का बसेल

प्रत्येक वाहनाला एक नंबर प्लेट असते, ती वाहनाची ओळख म्हणून वापरली जाते. भारतात आरटीओ कडून वाहनांना नंबर प्लेट दिली जाते, ज्यासाठी काही पैसे आकारले जातात. पण एक नंबर प्लेट करोडों रुपयांना विकली गेली आहे. असं काय आहे या नंबर प्लेट मध्ये हे आपण जाणून घेऊ.

काही दिवसापूर्वी मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला, ज्यामध्ये अनेक नंबर लाखो, कोटींना विकले गेले. या लिलावात P7 नंबर प्लेट सर्वाधिक किंमतीला विकली गेली आहे. त्याची किंमत इतकी आहे की मुंबईतील महागड्या भागात कोट्यवधींचा फ्लॅटही खरेदी करता येईल.

आता फेसबुकवर 18 वर्षांखालील मुलांचे अर्ध-नग्न फोटो व्हायरल होणार नाहीत, ‘टेक इट डाउन’ होणार सुरू

P7 नंबर प्लेट कितीला विकली

दुबईतील मोस्ट नोबल नंबर्सच्या लिलावादरम्यान कारची नंबर प्लेट P7 विक्रमी 55 दशलक्ष दिरहम किंवा सुमारे 1,22,61,44,700 रुपयांना विकली गेली. शनिवारी रात्री झालेल्या लिलावात त्यासाठी 15 दशलक्ष दिरहमची बोली लागली. काही सेकंदात ही बोली 30 दशलक्ष दिरहमच्या पुढे गेली.

मात्र 35 दशलक्ष दिरहमवर गेल्याने ही बोली काही काळ थांबली. यानंतर बोली 55 दशलक्ष दिरहमवर पोहोचली आणि ही बोली पॅनेल सातच्या व्यक्तीने लावली, ज्याने बोली गुप्त ठेवण्याची अट ठेवली. प्रत्येक बोलीवर लोकांचा उत्साह दिसत होता.

bird flu : चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर, 56 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू

नंबरही करोडोंमध्ये विकले गेले

जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला. लिलावातून सुमारे 100 दशलक्ष दिरहम ($27 दशलक्ष) जमा झाले. ज्याच्या पैशातून रमजानच्या काळात लोकांना खायला दिले जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube