Twitter माजी सीईओ जॅक डोर्सी आणणार नवीन सोशल मीडिया ऍप, ट्विटरला देणार टक्कर?

  • Written By: Published:
Twitter माजी सीईओ जॅक डोर्सी आणणार नवीन सोशल मीडिया ऍप, ट्विटरला देणार टक्कर?

जगप्रसिद्ध मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी एक नवीन सोशल मीडिया ऍप आणणार आहेत, BlueSky नावाचे हे ऍप ट्विटरप्रमाणेच दिसत आहे. त्याचा इंटरफेसही ट्विटर सारखाच आहे. ट्विटरवर ज्या पद्धतीने लोक ट्विट करू शकतात, लोकांना फॉलो करू शकतात, त्याच पद्धतीने हे ऍपही काम करत असल्याच सांगण्यात येत आहे.

सध्या हे ऍप अजूनही टेस्टिंग मोड मध्ये आहे. मात्र ते अँपल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही काळात सर्व वापरकर्ते हे ऍप वापरू शकतील अशी अपेक्षा आहे. BlueSky App १७ फेब्रुवारी रोजी पब्लिश करण्यात आले. टेस्टिंग मोडमध्ये सर्व अपडेट आणि तक्रारी निश्चित केल्यानंतर ऍप सर्व युझर्स साठी उपलब्ध होईल. सध्या केवळ इन्व्हाईट आणि बीटा मोडचा वापर करून वापरू शकतो.

हेही वाचा : गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च

जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. ट्विटर सर्वसामान्य युझर्सपर्यंत पोहचवण्यासाठी जॅक यांच योगदान महत्वाचं मानलं जात. त्यामुळे ब्लू स्काय लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान देऊ शकतात, असं बोललं जात आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी पेड सर्व्हिस सुरु केली.

ज्यामध्ये लोकांना आता ट्विटरवर ब्लू टिक्ससाठी पैसे द्यावे लागत आहेत. ट्विटर यामध्ये फक्त ब्लू टिकच नाही तर इतरही काही सेवा देते. जॅक डोर्सी लॉन्च करत असलेले ब्लू स्काय विनामूल्य आहे आणि त्यामुळे ते काही काळात चांगली प्रसिद्धी मिळवू शकते, असं अभ्यासकांच म्हणणं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube