Bell’s palsy : धनंजय मुंडेंना दुर्मिळ आजाराचे निदान; जाणून घ्या Bell’s palsy म्हणजे काय?, लक्षणं-उपचार काय?

What is Bell’s palsy Diagnose to Dhananajy Munde : गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे आरोपांचा ससेमिरा लागला आहे. त्यात आता त्यांना एका दुर्मिळ आजाराचे देखील निदान झाले आहे. याबद्दल मुंडे यांनी स्वत: त्यांच्या एक्स या सोशल मिडिया साईटवरून पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र हा आजार नेमका काय? त्याचे लक्षणं आणि त्यावर उपचार काय? जाणून घेऊ सविस्तर…
माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद जाणार ? भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ?
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी संबंध असल्याचा आरोप होत आहे. तसेच कृषी घोटाळा, बीडमध्ये विविध गैरव्यावहार असे एक ना अनेक आरोपांचे सत्र त्यांच्यावर सुरू आहेत. यामध्ये भाजप आमदार सुरेश धस तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून हे आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पत्नी करूणा शर्मा यांच्याकडून देखील त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला आहे.
2 वर्षाची शिक्षा, मंत्रीपद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंसमोर आता कोणते पर्याय? जाणून घ्या सर्वकाही
यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे हे डोळ्यांच्या आजारासाठी रूग्णालायात उपचार घेत होते. त्यानंतर आता त्यांना Bell’s palsy या एका दुर्मिळ आजाराचे देखील निदान झाले आहे. त्याबाबत सांगताना मुंडे म्हणाले की, ‘माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
त्याच दरम्यान मला…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025
VIDEO : आज अर्ज उद्या कर्ज; मुंडेंचा घोटाळा बाहेर काढत सुरेश धसांनी फोडला नवा बॉम्ब…
त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…’
Bell’s palsy म्हणजे काय?
Bell’s palsy हा आजर चेहऱ्याला होतो.चेहऱ्याच्या मांसपेशीच्या नसा आकुंचन पावतात.त्यामुळे चेहऱ्याला लकवा होतो. ज्याला Bell’s palsy म्हटलं जात.मात्र या आजाराचे ठोस कारणं अद्याप समोर आलेले नाही. तरी देखील चेहऱ्याच्या नसांना आलेली सुज या आजाराचं प्रमुख कारण मानलं जात आहे. त्याचबरोबर विविध व्हायरसचा हल्ला देखील या आजाराला कारणीभूत ठरवले जात आहे. कारण कोरोनानंतर या आजाराचे अनेक रूग्ण समोर आले आहेत.
Bell’s palsy ची कारणं
अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, जास्त तणाव किंवा मानसिक दडपण असणे,मधुमेह किंवा अगोदरच विविध आजारांचे रूग्ण असलेल्या लोकांना हा आजार होतो. ज्यामध्ये ब्रेन ट्यूमर (Brain Tumour),बहुत अधिक ठंड या कम तापमान, ईयर इंफेक्शन (Ear Infection,) नागीण या आजारांच्या लोकांना याचा धोका आहे.
Bell’s palsy चे लक्षणं काय?
या आजाराचे लक्षण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळू लक्षणं दिसून येतात. ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा होतो. डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे, थुंकी किंवा लाळ गळणे, बोलताना किंवा खाताना अडचण येणे,चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे,चव जाणवण्यात अडचण,कानाजवळ वेदना किंवा संवेदनशीलता वाढणे, डोके दुखी अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात.
Bell’s palsy वरील उपचार आणि काळजी काय?
साधारणत: या आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉइड किंवा अँटीवायरल औषधे घेणे, फिजिओथेरपी आणि चेहऱ्याच्या हालचालींशी संबंधित व्यायाम करणे,प्रभावित भागावर मालिश आणि गरम पाण्याने शेक करणे,डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आई ड्रॉप्स वापरणे, बहुतांश प्रकरणांमध्ये बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत आपोआप बरा होते. तर काही लोकांना 3 महिने, 9 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ बरा होण्यासाठी लागू शकतो. मात्र, लक्षणे जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.