चॅटिंगमध्ये पार्टनरचं प्रत्येक मेसेजला फक्त ‘Hmm’ उत्तर येतंय… काय समजावं?

Why Some Partner Says Hmm In Chatting आपण एखाद्याला मनापासून मेसेज करतो, आपल्या भावना व्यक्त करतो आणि समोरून उत्तर येतं - 'Hmm'

  • Written By: Published:
Relationship

Why Some Partner Says Hmm In Chatting : अनेकदा आपण आपल्या पार्टनरला मनातील भावना किंवा दिवसभराचा अनुभव लांबलचक मेसेजद्वारे सांगतो, मात्र समोरून उत्तर येते फक्त एक शब्द ‘Hmm’. हा छोटासा शब्द केवळ संभाषण तिथेच थांबवत नाही, तर मनात अनेक शंका आणि चिडचिडही निर्माण करतो. ‘हम्म’ हा केवळ एक शब्द आहे की, नात्यात निर्माण होणाऱ्या दुराव्याचा इशारा? यामागची मानसशास्त्रीय कारणे जाणून घेऊया.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही. काहीवेळा व्यक्ती भावनिकदृष्ट्या थकलेली असते, तिच्याकडे बोलण्यासाठी शब्द
नसतात किंवा ती त्या क्षणी संवाद साधण्याच्या मनःस्थितीत नसते. त्यामुळे ती केवळ ‘हम्म’सारखं छोटं उत्तर देऊन प्रतिक्रिया व्यक्त करते.

पार्टनरच्या ‘Hmm’ म्हणण्यामागची प्रमुख कारणे काय?

इमोशनल अंतर : काही लोक आपल्या भावना शब्दांत मांडताना सहज नसतात. जेव्हा चर्चा खूप गंभीर किंवा वैयक्तिक होते, तेव्हा ते ‘हम्म’ लिहून स्वतःला सुरक्षित अंतर देण्याचा प्रयत्न करतात. मानसशास्त्रात याला ‘इमोशनल स्पेस’ निर्माण करणं असंही म्हटलं जातं.

मानसिक किंवा शारीरिक थकवा : कामाचा ताण किंवा दिवसभराच्या थकव्यामुळे पार्टनरकडे सविस्तर उत्तर देण्याची ऊर्जा नसू शकते. त्यांच्यासाठी ‘हम्म’चा अर्थ असा असतो की, मी तुझा मेसेज वाचला आहे, पण आता मी सविस्तर बोलण्याच्या स्थितीत नाही.

चॅटिंगची पद्धत : प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगळी असते. काहींसाठी चॅटिंग हे केवळ माहिती देण्यासाठी असते, गप्पा मारण्यासाठी नाही. त्यामुळे ते उगाच संवाद लांबवण्यापेक्षा ‘हम्म’ किंवा ‘ओके’ म्हणून थांबणे पसंत करतात.

नात्यावर होऊ शकतो परिणाम

अधूनमधून ‘हम्म’ लिहिणं सामान्य असलं तरी प्रत्येक संभाषण अशाच उत्तरांवर संपत असेल, तर नात्यातील संवाद कमी होत असल्याचा तो संकेत असू शकतो. संवादाचा अभाव वाढल्यास गैरसमज आणि भावनिक दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

परिस्थिती कशी हाताळाल?

– योग्य वेळ साधून जोडीदाराशी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा.
– ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये उत्तर देता येणार नाहीत असे प्रश्न विचारा.
– महत्त्वाच्या किंवा संवेदनशील विषयांवर चॅटऐवजी फोन किंवा प्रत्यक्ष संवादाला प्राधान्य द्या.
– समोरच्या व्यक्तीची संवादशैली समजून घेण्याचा प्रयत्न करा.

इमोजीचा वापर करा संशोधन काय सांगतं?

एका संशोधनानुसार, जे जोडपे चॅटिंगदरम्यान टेक्स्टसोबत इमोजींचाही वापर करतात, त्यांना नात्यात अधिक जवळीक आणि समाधानाची भावना अनुभवायला मिळते. त्यामुळे डिजिटल संवादात भावना व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मेसेजला फक्त ‘हम्म’ उत्तर आलं, तर त्यामागे नेहमीच नाराजी किंवा दुर्लक्ष आहे असा निष्कर्ष काढण्याआधी परिस्थिती समजून घेणं अधिक गरजेचं ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijaya Santhoshini (@psychologist_santhoshini)

follow us