Viral Video : योगा करणं महिलेला पडलं महागात ! तोल गेला अन्…पाहा नेमकं काय घडलं
Viral Video : महिला योगा (Woman Yoga) करणे वाईट नाही. उलट ते आरोग्याला खूप चांगले आहे. पण, नको त्या ठिकाणी आणि नको त्या पद्धीतीने योगा करणे मात्र नक्कीच वाईट ठरणार आहे. (Watch Video) चुकीच्या ठिकाणी योगा करणे हे किती त्रासदायक आणि आपल्याच अंगाशी येणारे असू शकते, (Shocking Video) याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. ही महिला वाहत्या नदीवर असलेल्या पुलावर योगा करण्याचा प्रयत्न करत होती.
Go with the flow 😂 pic.twitter.com/BGZ120HZYL
— Shy (@shytaylaxoo) February 24, 2023
परंतु हा प्रयत्न करताना तिने योगासाठी पोझ घेतली आणि तिचा हात सटकला.(Woman Falls Into River While Yoga) यामुळे ती थेट नदीच्या पाण्यात कोसळली गेली. हा अत्यंत जीवघेणा ठरावा असा हा प्रसंग. ज्याच्या व्हिडिओ सध्या (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो सर्वात अगोदर चिसा मेरी हिने २०१७ मध्ये इंटरनेटवर पोस्ट केला होता. जो आता परत एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, नदीच्या पुलावर चिसा योगा करण्याचा प्रयत्न करत असताना ती पाण्यात पडल्याचे दिसत आहे. चिसा मारी नदीवरील लॉगवर ब्रिज पोज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. खाली पडून ती नदीच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याचेही दिसत आहे.
या पुलावरुन खाली ती साधारण ४ फूट खोल नदीमध्ये पडली आणि जवळपास ३० फूट लांब अंतरावर वाहून गेली असल्याचे दिसून येत आहे. चिसाचा अनुभवही काही प्रसारमाध्यामांनी सांगितला आहे. चिसाने म्हटले की, पाण्यातून बाहेर मी जेव्हा नदीच्या काटावर आली तेव्हा मी स्वत:वरच खूप हसत होती. इतकी की, आयुष्यात कधी मी एवढं हसले नव्हते. परंतु सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ट्विटरवर १ दशलक्षाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यामुळे स्वतः ला देखील खूप वाटत चंगळ वाटत असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.