Video : या घटनेत कुठंही जाती-धर्माचा संबंध नाही; शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, काय म्हणाले?

Dhananjay Munde meets Shivraj Divate : बीड जिल्हा आणि त्यातही प्रामुख्याने परळी शहरात कायम खून, मारहाण अशा घटना घडत आहे. आता नुकतीच परळीत एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. (Munde) दरम्यान, गेली अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित शिवराज दिवटे याची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
दिवटे हे आमच्या कुटुंबातील लोक असल्यासारखे आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कोणताही जातीचं किंवा धर्माचं स्वरूप देऊ नये असं धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्याचबरोबर जे कोणी यातील आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असंही मुंडे म्हणाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Video : संतोष देशमुखांचा दुसरा पार्ट होता-होता वाचला; आमदार धस परळी प्रकरणावर काय म्हणाले?
दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज दिवटे याची आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. लिंबोटा गावचे शिवराज, संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत.
शिवराजला मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जावी. बीड पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या नेतृत्वात पोलीस योग्य तपास करतील व आरोपींना कडक शासन केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या घटनेत कुठेही जाती धर्माचा संबंध नाही, या पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. शिवराजला न्याय मिळणे व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे यासाठी आगामी काळात कठोर पावले उचलली जावीत, याबाबत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.
नुकतीच परळीत एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. पीडित शिवराज दिवटे या तरुणाची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.@dhananjay_munde #ShivrajDivte pic.twitter.com/bgzz4hdj9M
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 18, 2025