Video : सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत येताच पोलीस विभागावर नाराजी; वाचा, नक्की काय घडंल?

Video : सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत येताच पोलीस विभागावर नाराजी; वाचा, नक्की काय घडंल?

Chief Justice Bhushan Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबईत बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात विविध मुद्यांवर भाष्य केलं. (Gavai) सत्काराच्या भाषणाच्या समारोपावेळी महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित न राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर तातडीनं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेनं भारती मुख्य सचिव सुजाता सौनिक सरन्यायाधीशांच्या भेटीसाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाल्या.

सरन्यायाधीश काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्याचा एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येत असताना, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना, महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तिथं येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार केला पाहिजे. मला प्रोटोकॉलचं बिल्कुल ही काही वाटत नाही. अजूनही अमरावती आणि नागपूरला जात असताना पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला मित्रांच्या दुचाकीवरुन फिरायचो असं म्हणत गवई यांनी पोलीस विभागाला जोरदार फटकारलं.

अधिकाऱ्यांची धावाधाव

सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर सरन्यायाधीश दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी डीजी रश्मी शुक्ला सोबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती सुद्धा चैत्यभूमी मध्ये दाखल होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी चैत्यभूमी मध्ये दर्शन घेण्यापूर्वी डीजी रश्मी शुक्ला सोबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सुजाता सैनिक सोबत चर्चा केली. त्या चर्चेवेळी भूषण गवई यांनी नाराजी व्यक्ती केली. यानंतर तिन्ही अधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube