धनंजय मुंडेंकडून मला 18 तुकडे करण्याची धमकी, करुणा शर्मांचा गंभीर आरोप

धनंजय मुंडेंकडून मला 18 तुकडे करण्याची धमकी, करुणा शर्मांचा गंभीर आरोप

Karuna Sharma : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केला. धनंजय मुंडे यांच्याकडून मला धमक्या धमक्या दिल्या जात आहे, त्यांनी स्वत: मला १८ तुकडे करण्याची धमकी दिली, असा मोठा आरोप करुणा शर्मा यांनी केला. त्यामुळे आपल्याला पोलिस संरक्षण मिळावं, अशी मागणी करूणा शर्मा यांनी केली. तसेच माझ्यावर लव्ह जिहादपेक्षाही (Love Jihad) जास्त अन्याय झाला, असंही त्या म्हणाल्या.

VIDEO : सिंधू पाणी करार स्थगित; तुम्ही पाणी कुठे घेऊन जाणार आहात? मौलाना अरशद मदनी यांचं वादग्रस्त विधान 

एबीपी माझाशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मला कोर्टाकडून २ लाख रुपयांची पोटगी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. त्या दिवसापासून धनंजय मुंडे स्वतः मला मारण्याची, माझ्या मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देत ​​आहेत. मी या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी स्वतः मला फोन करून धमकी दिली. ते मला फोनवर म्हणाले, तू जास्त तोंड उघडत आहे, माझ्या बहिणीवर बोलत आहेत…. तुझी बहीण आणि तू किती पाण्यात आहे, हे मी दाखवून देणार आहे. मी आता तरी 50 टक्के सांगितलं आहे. पण, ज्या दिवशी माझ्या डोक्यावरून पाणी जाईल, त्या दिवशी आणखी 50 टक्के तोंड उघडेल, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला.

एअर इंडियाचं विमान अचानक अबूधाबीत उतरलं; इस्त्रायलमधील हल्ल्यानंतर दिल्लीला परतणार 

गुंड मला मुलीला उचलून नेण्याची धमकी देत ​​आहेत. तर धनंजय मुंडे यांनी मला धमकी दिली की, तुझे १८ तुकडे करणार. तुझी बदनामी करणार. मी त्यांना आव्हान देते, माझी बदनामी करा. माझे १८ तुकडे करा. जर तुम्ही एका बापाची अवलाद असाल तर कुठे माझे तुकडे करणार सांगा, मी तिथे येते, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.

तसेच येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी जाणार आहे. त्यांना विचारणार आहे की, तुम्ही फक्त लव्ह जिहादच्या मुद्द्यावर कायदा बनवणार आहात का? माझा नवरा, जो हिंदू आहे, गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर लव्ह जिहादपेक्षा जास्त अन्याय करत आहे. मी इकडे तिकडे फिरत आहे. पण कोणताही मंत्री किंवा खासदाराने मला न्याय मिळवून देण्याची गोष्ट केली नाही, असं करुणा शर्मा म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube