अचानक खात्यात 10 लाख जमा झाले, निलंबित PSI कासलेंचा परळी विधानसभा निवडणुकीबद्दल धक्कादायक खुलासा

अचानक खात्यात 10 लाख जमा झाले, निलंबित PSI कासलेंचा परळी विधानसभा निवडणुकीबद्दल धक्कादायक खुलासा

Suspended PSI Ranjit Kasale On Parli Assembly Election : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत काही पोलिसांवर कारवाई देखील करण्यात आली आहे तर काही पोलिसांची चौकशी सुरु आहे. यातच बीड जिल्ह्याचे पोलीसअधीक्षक नवनीत कांवत (Navneet Kanwat) यांनी आणखी एका पीएसआयला निलंबन केले आहे.

परराज्यात तपासकरता गेल्या असता तडजोड केली असल्याचा आरोप या पीएसआयवर (PSI) करण्यात आला आहे. निलंबन करण्यात आलेल्या पीएसआयचे नाव रणजीत कासले (Ranjit Kasale) असं आहे. तर दुसरीकडे कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई होताच त्यांनी परळी विधानसभा निवडणुकीबाबत सोशल मीडियावर धक्कादायक खुलासे केले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

खात्यात 10 लाख रुपये जमा झाले

निलंबीत पीएसआय कासले यांनी एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची नावे घेत गंभीर आरोप केले आहे, या व्हिडोओमध्ये बोलताना कासले यांनी दावा केला की, विधानसभा निवडणुकीच्यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या पकडल्यामुळे त्यांनी परळीत बंदोबस्त लावला होता. मी गाड्या चेक करत होतो म्हणून मला त्या दिवशी काम नाही सांगितलं. परंतु पेट्या येण्याच्या दिवशीय मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला आणि मला आरक्षित ठेवलं. आणि त्याच दिवशी माझ्या खात्यात संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या खात्यातून 10 लाख रुपये जमा झाले. असा दावा त्यांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे. तसेच माझ्या खात्यात 10 लाख रुपये का जमा झाल्या? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अभिनेता अरमान कोहलीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला, 7 लाखांचा मुद्देमाल लंपास 

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आयपीएस निखिल गुप्ता त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर सुरजच्या बिल्डरच्या बायकोची इच्छा होती, मला सस्पेंड करावं. कारण त्यांच्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. मला जनतेने न्याय द्यावा. असं कासले यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube