2024 पूर्वचा सर्वे भाजपचे टेन्शन वाढविणारा; शिंदे गट ठरतोय डोकेदुखी
2024 Loksabha Election Survey : 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला आता 1 वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. याआधी 2014 व 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युतीला भरघोस जागा मिळाल्या होत्या. यानंतर आता 2024 साली होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात तसेच यश मिळणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्त समुहाने 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा सर्व्हे केला आहे.
2014 साली भाजप व शिवसेना युतीला राज्यामध्ये 42 लोकसभेच्या जागा जिंकण्यात यश आले होते. तर 2019 साली भाजप व शिवसेना युतीने लोकसभेच्या 41 जागा जिंकल्या होत्या. पण आता मात्र राज्यातील चित्र बदलले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतनंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह आले आहे. तर उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी अन् काँग्रेसबरोबर आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना सकाळ वृत्त समुहाने एक सर्वे केला आहे.
कोल्हापूरात येत्या दोन महिन्यांत दंगली घडविण्याचे कारस्थान; सतेज पाटलांच्या दाव्याने खळबळ
त्यामध्ये लोकसभेच्या 2024 निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर मोदींना अधिक पसंती दर्शवली आहे. हो या शब्दाला 42.1 टक्के मतदारांचा कल आहे. तर नाहीकडे 41.5 टक्के मतदारांनी आपला कल दर्शवला आहे. तसेच 16 टक्के मतदार हे तटस्थ आहेत. महाराष्ट्रातील 288 विधानसभा अन् 48 लोकसभा मतदारसंघामध्ये हा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये 32 टक्के महिलांनी आपले मत नोंदवले आहे. असे जरी असले तरी आता या सर्वेमध्ये राज्यातील शिवसेना व भाजप युतीला मोठा फटका बसणार आहे. याचे कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला अत्यल्प मतदान झालेले दिसून येत आहे.
राष्ट्रवादीत लंकेंना आता टक्कर; लोकसभेसाठी बलाढ्य दावेदार वाढले !
2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मतदान कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपला 33.8 टक्के लोकांनी आपली पसंती दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी फक्त 5.5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसला 19.9 टक्के, राष्ट्रवादीला 15.3 टक्के, उद्धव ठाकरे गटाला 12.5 टक्के, शेकाप 0.7 आणि वंचित आघाडीला 2.9 टक्के एवढी पसंती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एकुण 47.7 टक्के लोकांनी मविआला पसंती दर्शवली आहे. तर भाजप अन् शिवसेना युतीला 39.3 टक्के लोकांना पसंती दर्शवली आहे. यावरुन आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमुळे भाजपचे घोडे अडणार असल्याचे बोलले जात आहे.