अजितदादांच्या निकटवर्तीयांना जयंत पाटलांचा दणका; 21 जणांची एका फटक्यात पक्षातून हकालपट्टी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 बंडखोर आमदारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित असलेल्या 21 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. हकालपट्टी झालेले सर्व पदाधिकारी हे प्रमुख जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख शहरांचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आहेत. (21 office bearers who close aid to Deputy Chief Minister Ajit Pawar have been expelled from the NCP party.)
कारवाई करताना काय म्हंटलं जयंत पाटलांनी?
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी… pic.twitter.com/Q22dnV5twh
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 18, 2023
हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावं :
- बाबाजी जाधव – रत्नागिरी जिल्हाध्यक्ष
- राजाराम मुळीक – वसई- विरार जिल्हाध्यक्ष
- अजित दामोदर गव्हाणे – पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष
- प्रशांत कृष्णराव शितोळे – पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष
- राहूल हनुमंत भोसले – पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष
- जगदीश शंकर शेट्टी – पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष
- फजल दस्तगीर शेख – पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष
- ए. वाय पाटील – कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष
- रविंद्र पगार – नाशिक (दिंडोरी लोकसभा)
- माणिकराव विधाते – अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष
- अभिजीत खोसे – अहमदनगर शहर कार्याध्यक्ष
- डॉ. अभिजीत मोरे – नंदुरबार जिल्हाध्यक्ष
- प्रताप देशमुख – परभणी शहर जिल्हाध्यक्ष
- कैलास पाटील – औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष
- राजेश्वर चव्हाण – बीड जिल्हाध्यक्ष
- बाबासाहेब पाटील – लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष
- अफसर शेख – लातूर ग्रामीण कार्याध्यक्ष
- प्रशांत पाटील – लातूर शहर कार्याध्यक्ष
- सुरेश बिराजदार – उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष
- चंद्रकांत ठाकरे – वाशिम जिल्हाध्यक्ष
- बाळासाहेब पाटील (कामारकर) – यवतमाळ जिल्हाध्यक्ष