मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळा घाटात भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळा घाटात भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

Private Bus Accident on Mumbai-Goa Highway : मुंबईकडून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. (Highway) रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात येथे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

कर्नाळा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली. बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय. 30 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर पनवेलमधील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात एका चिमुकलीचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. तर काहींची प्रकृती गंभीर आहे.

Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल

ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक एमएच 47, वाय 7487 ही 35 प्रवासी घेऊन कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला. घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस उटल्याचं कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं.

कर्नाळा घाटात अपघातामुळे कर्नाळा खिंड परिसरात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खासगी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शर्थीचे प्रयत्न तातडीने सुरु करण्यात आलं. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 23 प्रवाशांवर पनवेलमधील एमजीएममध्ये तर दोघा प्रवाशांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube