ताम्हिणी घाटात गंभीर अपघात; खाजगी बस पलटली, ५ जण ठार, २७ जण जखमी

  • Written By: Published:
ताम्हिणी घाटात गंभीर अपघात; खाजगी बस पलटली, ५ जण ठार, २७ जण जखमी

Accident at Tamhini Ghat : ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ एक बस पलटी झाल्याने गंभीर अपघात घडला आहे. काही प्रवासी बसमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. (Tamhini Ghat) माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित आपल्या टीमला घटनास्थळी रवाना केले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. रिस्कयू टीम, पोलीस व ऍम्ब्युलन्स पोहचत आहेत. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकरच्या स्फोटात ५ जण जिवंत जळाले; २० वाहनांना आग, ३० जण होरपळले

संगीता धनंजय जाधव,गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहे. एका मृतांची ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

माणगाव पोलिसांची त्वरीत कारवाई

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना शक्य तितक्या लवकर उपचार मिळावेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू आहेत.

जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची ऍम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे नेमके कारण अजून अस्पष्ट

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ताम्हिणी घाट हा आपल्या धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच खराब होते, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. प्रशासनाने या अपघाताचे कारण शोधून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

भागात ८.९ अंश तापमानाची नोंद

ताम्हिणी घाटात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणे, आणि खराब हवामान यामुळे हा भाग प्रवाशांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube