250 कोटींचे व्यवहार अन् सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह 9 जण निलंबित; नागपुरात नेमकं घडलं काय?
Nagpur Cyber Police : एकाच वेळी नागपूर जिल्ह्यातील 9 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय चुका, अंतर्गत वाद
Nagpur Cyber Police : एकाच वेळी नागपूर जिल्ह्यातील 9 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय चुका, अंतर्गत वाद आणि निष्काळजी तपासामुळे नागपूर सायबर पोलीस ठाण्यात एकाच वेळी 9 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आला आहे. नागपूर सायबर ठाण्यात गैरकारभार सुरु असल्याची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे आल्याने या तक्रारींची दखल घेत विभागीय चौकशीचे आदेश दिले.
तसेच ही चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी 9 जणांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. यात पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, योगेश घारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे आणि इतर 6 हवालदारांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
हिरेन भोजवानी यांच्या तक्रारीनंतर एका सायबर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथक पुण्यात गेले होते. पुण्यात या पथकाने 14 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसांच्या या तपासात क्रिकेट सट्टेबाजीचे मोठे रॅकेट समोर आले होते. तपासातून एकांशी नावाच्या बुकीने 40 पेक्षा जास्त बँक खात्यांद्वारे तब्बल 250 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली होती. तब्बल 250 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्यानंतर देखील या प्रकरणात मुख्य आरोपीला केवळ नोटीस देऊन सोडण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणाची चर्चा जोराने सुरु झाल्यानंतर मुख्य आरोपी फरार झाला होता. मुख्य आरोपी फरार झाल्याने काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच ही माहिती सोशल मीडियावर समोर आल्यानंतर काही अधिकाऱ्यांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याचेही समोर आले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहे.
2029 साठी भाजपची मोर्चेबांधणी; राजेश पांडे आणि डावखरे यांच्यावर मोठी जबाबदारी
तसेच चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी 9 जणांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.