2029 साठी भाजपची मोर्चेबांधणी; राजेश पांडे आणि डावखरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Ravindra Chavan : राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी केल्यानंतर आता भाजपने पक्षाच्या संघटनात्मक

Ravindra Chavan

Ravindra Chavan : राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी केल्यानंतर आता भाजपने पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सहा विभागांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey) यांच्याकडे सोपवण्यात आली असून ठाणे- कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश पांडे यांच्याकडे मुंबई विभागाच्या समन्वयाची जबाबदारीसह प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. तर ठाणे-कोकण विभागासाठी माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहे.

तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विक्रम पावसकर संयोजक आणि विक्रम देशमुख सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहेत. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असणार आहे. तर विजय चौधरी संयोजक आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम करणार आहे.

मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. तर अ‍ॅड. नितीन काळे संयोजक आणि राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

करंजी घाट बनतोय मृत्यूचा सापळा… अपघातात एक ठार-

तसेच विदर्भासाठी प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याचीही माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून लागू होणार आहे.

follow us