डिलिमिटेशन भाजपचा कट; पाठिंबा देणारे जनतेशी विश्वासघात करत आहे.. संजय राऊत स्पष्टच म्हणाले
Sanjay Raut On Delimitation Bill : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून चार दिवसांचे विशेष संसदीय अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात
Sanjay Raut On Delimitation Bill : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून चार दिवसांचे विशेष संसदीय अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू होईल. कायदेशीर आवश्यकता लक्षात घेता, दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या अधिवेशनात केंद्र सरकार डिलिमिटेशन बिल आणणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP) आणि डिएमके (DMK) पाठिंबा देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला आहे. डिलिमिटेशन बिल भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणले जात आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
एक्सवर संजय राऊत म्हणाले की, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते. डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते 21व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे. “इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात असं संजय राऊत म्हणाले.
प्रश्नकाल, शून्यकाल नाही… 4 दिवसांचे संसदीय अधिवेशन कसे असेल; जाणून घ्या सर्वकाही-
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत:
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत,
नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल
अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते:डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे.
जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!
म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो;
गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात ”
@PawarSpeaks
@narendramodi
@BJP4Maharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) November 27, 2026
तर दुसरीकडे जर तमिळनाडूच्या सध्याच्या लोकसभा जागांच्या वाट्याला (सुमारे 7.2%) कोणताही धक्का लागणार नाही, अशी खात्री मिळाली, तर डीएमके या पुनर्रचना प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा विचार करू शकते. तर विधेयक सादर होण्याची वाट पाहील, त्यातील तरतुदींचा अभ्यास करेल आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेईल असं सुप्रिया सुळेंकडून सांगण्यात येत आहे.