“50 खोके….” चा व्हिडीओ शेअर केलात तर गुन्हा दाखल होणार, नाशिक मध्ये पहिला गुन्हा दाखल

  • Written By: Published:
“50 खोके….” चा व्हिडीओ शेअर केलात तर गुन्हा दाखल होणार, नाशिक मध्ये पहिला गुन्हा दाखल

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यापासून ५० खोके ही घोषणा राज्यभर गाजली. गेल्या काही महिन्यापासून रोज कुठे तरी हे तुम्हाला ऐकायला मिळत. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या अनेक आमदारांना डिवचण्यासाठी विरोधी पक्षाकडून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. याच वाक्यावरून अनेक ठिकाणी मोठे वाद झालेलेही पाहायला मिळाले.

आता पुन्हा या वाक्यावरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण नाशिक येथे ‘५० खोके’ असा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी नाशिक मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Budget Session : कानडी दंडेलशाहीचे विधानपरिषदेत पडसाद; सत्ताधारी-विरोधक भिडले !

नक्की काय आहे व्हिडीओ मध्ये ?

नाशिक मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीतून बाहेर पडत असतांना मोठी गर्दी झाली होती. पालकमंत्री दादा भुसे देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. त्यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले होते. याच वेळेला पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

याच व्हिडीओवरून नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अदखल पात्र गुन्हा आहे. दरम्यान यावेळी अशा कुठल्याही घोषणा दिल्या नव्हत्या तरी बदनामीसाठी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हंटले असून शरद कातकडे यांनी याबाबत साक्षीदार म्हणून माहिती दिली आहे. त्यानंतर वावी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

Budget session : साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन थोरात-फडणवीस आमने सामने

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube