Marijuana : व्वा रे पठ्या ! मोसंबीच्या शेतात लावला गांजा, शेवगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Marijuana : व्वा रे पठ्या ! मोसंबीच्या शेतात लावला गांजा, शेवगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Marijuana Farm : शेतीत पीक पिकून उदरनिर्वाह करणारा बळीराजा आजवर आपण पहिला असेल. मात्र शेवगाव मधील एका पठ्याने चक्क फळबागाच्या शेतीमध्येच गांजाची शेती केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आखतवाडे शिवारात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असून 129 गांजाची झाडे जप्त केली आहे. 113 किलो वजन असलेल्या या झाडांची किंमत पाच लाख 65 हजार रुपये आहे. ( A farmer Growing Marijuana in Mosambi Farm Ahmednagar )

अपात्र आमदारांचा निर्णय कुठं अडलायं? विधानसभा अध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलं…

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली आहे, अशी माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली. माहितीच्याआधारे पोलिसांनी पथक तयार केले.

Threads; ‘थ्रेड्स’वरुन मस्क-झुकरबर्गमध्ये जंगी युद्ध, एका ट्विटने दोघांत जुंपली

यामध्ये शेवगावचे परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, उमेश गायकवाड, सुजित सरोदे, सुनील रत्नपारखी, सचिन खेडकर, एकनाथ गर्कळ, वैभव काळे, रूपाली कलोर यांनी संबंधित शेतात छापा टाकला. तेथे मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे असल्याचे दिसून आले.

शेतात अरुण बाजीराव आठरे (वय 44, रा. बोरवलवस्ती, आखतवाडे, ता. शेवगाव) नामक शेतकऱ्याने आपल्या मोसंबीच्या बागेत गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. यावेळी तेथे तब्बल 129 गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे वजन 113 रुपये भरले असून या झाडांची किंमत पाच लाख 65 हजार रुपये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी ही झाडे जप्त करून अरुण आठरे यास ताब्यात घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube