धक्कादायक! महिलेचं काम देण्याच आश्वासन, बारामतीच्या मुलीवर बीडमध्ये सामूहिक अत्याचार

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 17T163831.613

बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.(Beed) नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असं आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ‘पायल कलाकेंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.

बीड जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले कायम! शिरुरमध्ये मेंढपाळाच्या घोड्यावर अन् मेंढीवर हल्ला

या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील लॉजवर नेण्यात आलं. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया,प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आलं आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. अत्याचारानंतर पीडितेने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.

follow us