गर्भवती माता अन् बालकांना मिळणाऱ्या आहारात सापाचं पिल्लू, विधानसभेत विश्वजीत कदम आक्रमक

गर्भवती माता अन् बालकांना मिळणाऱ्या आहारात सापाचं पिल्लू, विधानसभेत विश्वजीत कदम आक्रमक

Nutrition Food : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी पुरवण्यात येणारा माल किती निकृष्ट दर्जाचा असेल याची आपण कल्पना करू शकत नाहीत. (Nutrition Food ) दरम्यान, याबाबत सांगली जिल्ह्यातून जी बाब समोर आली आहे ती अतिशय गंभीर आहे. (Vishwajit Kadam) येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारवाई करण्याचे आदेश दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन; नागपूर पोलिसांकडून १२५ जणांवर गुन्हा दाखल

सांगलीच्या पलूस येथे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात वाळा जातीच्या सापाचं मृत पिल्लू आढळून आले आहे. पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आलं होतं. यातील काही पॅकेट घरी गेल्यावर उघडले असता त्यामध्ये सापाचे मृत पिल्लू सापडलं आहे. या घटनेची आमदार विश्वजीत कदम यांनी खंत व्यक्त करत विधानसभा अध्यक्षांकडे याकडे सरकारने गांभिर्याने पाहून कारवाई करावी आशी विनंती केली आहे. त्यावर अध्यक्षांनी सरकारला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमके काय घडले? ठरलं! राहुल गांधींनी पवारांचं आमंंत्रण स्वीकारलं; पंढरीच्या वारीत होणार सहभागी, तारीख आली समोर

कृषिनगर अंगणवाडी क्रमांक ११६ येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला. त्यानंतर ते पाकीट त्यांनी फोडलं. त्यानंतर त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. संबधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क करत याबद्दल संपर्क केला. दरम्यान, पोषण आहार वाटप कार्यक्रम थांबवला आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली 

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि अळ्या लागल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुन्हा आता मृत साप सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज