दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन; नागपूर पोलिसांकडून १२५ जणांवर गुन्हा दाखल

दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन; नागपूर पोलिसांकडून १२५ जणांवर गुन्हा दाखल

Dikshabhumi Underground Parking Incident : नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी आंदोलन केलं होतं. आंदोलकांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. (Dikshabhumi) पोलिसांनी याप्रकरणी १२५ पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Incident) पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीशी संबंधित असलेल्या रवी शेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठरलं! राहुल गांधींनी पवारांचं आमंंत्रण स्वीकारलं; पंढरीच्या वारीत होणार सहभागी, तारीख आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून १२५ पेक्षा जास्त जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन, जाळपोळ केल्याप्रकरणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांविरोधात हे गुन्हे नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १५ आंदोलकांची ओळख पटलेली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या शाळांना काल सुट्टी देण्यात आली होती. आजही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

साखर पट्ट्यातल्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांवर मोदी सरकारची कृपा; 1898 कोटी रुपये मंजूर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमी प्रकरणी रवी शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवी शेंडे हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी संबंधित आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्ष पदावर आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या १५ लोकांची प्राथमिक ओळख पटली आहे. यासह अज्ञात मध्ये ११० च्या वर आंदोलकांचे नाव आहे. यात नागपूरबाहेरील जिल्ह्यातील सुद्धा काही जणांची नाव असून पोलिस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे. पोलिस याबाबत कुठेही नाव पुढे करत नसून कमालीची गुपत्ता पाळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube