इफ्तार पार्ट्या करणाऱ्यांना निवडणुकीसाठी वारी आठवली; वारीच्या निमंत्रणावरून भाजप आक्रमक

इफ्तार पार्ट्या करणाऱ्यांना निवडणुकीसाठी वारी आठवली; वारीच्या निमंत्रणावरून भाजप आक्रमक

BJP Aggressive on Sharad Pawar Invite Rahul Gandhi for Wari : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंढरपूरच्या वारीला (Wari) येण्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून मात्र भाजपच्या (BJP Aggressive) अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी थेट वारीचं आमंत्रण देण्याचा अधिकार मौलाना शरद पवार यांना कुणी दिला? असा सवाल केला आहे.

काय म्हणाले तुषार भोसले?

हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या तसेच हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या, राहुल गांधी यांना वारीला यायचं निमंत्रण देण्याचा अधिकार मौलाना शरद पवार यांना कोणी दिला? गेल्या कित्येक वर्षांपासून जगद्गुरु तुकोबारायांची पालखी शरद पवारांच्या गावातून जाते. मात्र ते त्यांच्या 85 वर्षांच्या आयुष्यात एकदाही त्यात सहभागी झाले नाही. त्यामुळे शरद पवार कोणत्या तोंडाने राहुल गांधींना वारीचे निमंत्रण देत आहेत? कायम इफ्तार पार्ट्या करणारे शरद पवार आणि राहुल गांधी त्यांना आजपर्यंत वारी आणि वारकरी दिसले नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ते वारीत यायचा प्रयत्न करत आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला कळते. असं म्हणत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Arbaaz Khan: 56 व्या वर्षी अरबाज पुन्हा बाबा होणार? शूरा खानसह हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, व्हिडिओ Viral

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीला यावं, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट (2 जुलै) मंगळवारी झाली असून पंढरपूरच्या वारीला राहुल गांधी यांना येण्याचं निमंत्रण या भेटीदरम्यान देण्यात आले.

दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन; नागपूर पोलिसांकडून १२५ जणांवर गुन्हा दाखल

तर त्यानंतर आता राहुल गांधींच्या वारीत सहभागी होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, येत्या 14 जुलै रोजी राहुल गांधी 14 जुलै 2024 रोजी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube