धक्कादायक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी लावलं ॲसिड; महिला गंभीर जखमी
पोटातील बाळाचे ठोके चेक करताना नर्सने पोटावर ऍसिड टाकल्यानंतर गर्भवती महिला ओरडू लागल्याने नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली.

Accident In Jalna District : भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला जेली आयवजी नर्सकडून ऍसिड लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. (Jalna) नीता जाधव (महिलेच नाव बदलल आहे) अस या प्रसूती साठी दाखल असलेल्या महिलेचे नाव असून सोनोग्राफीच्या अर्ध्या तासानंतर या महिलेने गोंडस बाळाला जन्म ही दिला आहे. सुदैवाने बाळ सुखरूप आहे.