‘त्या’ लाभार्थी महिलांसाठी करणार बदल; लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री तटकरेंची मोठी माहिती
Aditi Tatkare यांनी पती आणि वडिल दोन्ही नसलेल्या महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
Aditi Tatkare on Ladaki Bahin Sceme Website Change for womens have not Husband or Father : 2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धरतीवर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या ई केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने तात्काळ ही केवायसी करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा अनुदान बंद होण्याचे देखील शक्यता आहे. मात्र दोन महिन्यांच्या कालावधीत ही वेबसाईट चालत नव्हती तसेच अनेक महिलांच्या कागदपत्रांची अडचण येत असल्याने त्या लाभार्थी महिलांसाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी संबंधित महिलांना यामध्ये आपल्या पती किंवा वडिलांच्या आधारची माहिती द्यावी लागत आहे. पण अशा अनेक लाभार्थी महिला आहेत. ज्यांना पती आणि वडिल दोन्ही नाहीत. त्यांच्यासाठी यावर काहीही पर्याय नाही. त्यामुळे अशा लाभार्थी महिलांची ई केवायसी होणे कठीण झाले आहे. त्यात ही केवायसी न केल्यास अनुदान बंद होण्याचे देखील शक्यता आहे.
मोठी बातमी! स्फोटने दिल्ली हादरलेली असतानाच मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी
त्यावर आता त्या लाभार्थी महिलांसाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशांसाठी महिलांसाठी लाडकी बहीण योजना या वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार आहेत. लाभार्थी ज्या महिला आहेत. त्यांना अनुदान मिळणार मात्र केवायसीसाठी जो वेळ लागतोय तो लवकरच पूर्ण होईल. कोणतेही महिला लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.
