पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करुनच, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करुनच, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीवरुन आजही वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यावरुन अजित पवार यांना लक्ष्यही केले जाते. त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादीसोबत कसे सेटिंग झाले होते, याबाबत फडणवीस सांगत असल्याचे दिसून येत आहे.

फडणवीस म्हणाले, निवडून आल्यानंतर शिवसेनेबरोबर (Shivsena) आमची बोलणी सुरू होती. पण शिवसेनेने आधीच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) जाण्याचे निश्चित केले होते.


Sharad Pawar गौप्यस्फोटावर महाजनांचा पलटवार, ‘देशमुखांनाच भाजपमध्ये येण्याची इच्छा’

त्यामुळे आम्हालाही पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. दहा ते बारा दिवस यात निघून गेले होते. काँग्रेसबरोबर तर आम्ही जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही एनसीपीबरोबर बोलणे केले. आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला प्रस्ताव आला होता, असे स्पष्टीकरण फडणीसांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात दिले आहे.

Politics : केसीआरच्या पक्षाला महाराष्ट्रात कोण देणार हात ? ‘या’ नेत्यांची राजकीय वर्तुळात चर्चा

एवढंच नाही तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आमचे बोलणे अंतिम टप्प्यात होते, आता इथे कॅमेरा नाही आहे. त्यामुळे बोलण्यास काही हरकत नसल्याचेही ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. तसेच आम्ही सरकार बनवण्याची सर्व कवायत पूर्ण केली. म्हणजे खातेवाटप कसे असणार, पालकमंत्री कोणाला मिळणार या सर्व गोष्टी अंतिम झाल्या होत्या आणि हे सर्व अजित पवारांशी नाही तर शरद पवारांशी बोलणे झाले होते.

प्रत्येक गोष्ट शरद पवार यांच्याशी बोलून अंतिम करण्यात आली होती. राजकारणात कधी कधी असे होते, म्हणजे जे राष्ट्रपती शासन लागले, त्यासाठी राष्ट्रवादीची जे पत्र होते, ते पत्रही मीच लिहिलं होतं, असाही गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

शिवसेना आमच्याशी बोलण्यासही तयार नव्हते. माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यासोबत निवडणुका लढवल्या, पण आपला मुख्यमंत्री होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी माझा फोनही घेतला नाही.

त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर निघून गेले. दुसरा विश्वासघात आपण सर्वांनी बघितला. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी ठरल्या होत्या, पण ठरलेल्या गोष्टी बदलल्या. हा देखील एक प्रकारचा विश्वासघातच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube