राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, शिष्टमंडळाची मंत्री महाजनांशी सकारत्मक चर्चा

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, शिष्टमंडळाची मंत्री महाजनांशी सकारत्मक चर्चा

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. बैठकीत चर्चा सकारत्मक झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं आहे.

मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांकडून विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले, निवासी डॉक्टरांची गैरसोय होणार नाही याबाबत आम्ही काळजी घेत आहोत.

डॉक्टरांच्या वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची शिष्टमंडळाशी सकारत्मक चर्चा झाली असून आंदोलनाआधीच मला सांगितलं असतं तर आंदोलन करण्याची गरज पडली नसती असंही ते म्हणाले आहेत. यानंतर आंदोलन करण्याआधी मला भेटा, असंही आवाहन त्यांनी केलंय.

आम्ही वसतिगृहासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटींच्या निधी मागितला असून त्याशिवाय, सीएसआर अंतर्गत निधीची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडे करण्यात आली आहे. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

येत्या दोन दिवसांत एक हजार 432 पदे भरली जाणार आहे. या भरतीचा प्रस्ताव याआधीच होता. त्याला अधिक गती येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केला आहे.

दरम्यान, आज आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही संप मागे घेत आहोत. निवासी डॉक्टरांचा संप आता मागे घेतला आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे संप मागे घेतला असल्याचे निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube