सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, जयंत पाटलांनी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?
विजयानंतर ईश्वरपूर शहर आणि राजारामबापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावले आहेत. त्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आली आहे.याचेच पोस्टर ईश्वरपूर मध्ये लागले आहेत.
“सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही” हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे.हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरची शहरभरच नाही तर राज्यभर चर्चा सुरू आहे. या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सभेतील शिवराळ भाषेतून केला होता. त्याला आता पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरमधून उत्तर दिलं आहे.
गड आला पण सिंह गेला! गोदाकाठचा वाघ बीडमध्ये, घराणेशाही संपली का? वाचा A टू Z कहाणी
सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीची टीम ईश्वरपूर मध्ये उत्तरली होती. तर जयंत पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभा घेतली होती.मात्र जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवल्यानंतर ईश्वरपूर मध्ये एकच जल्लोष करण्यात आला यावेळी स्वतः हा जयंत पाटील आणि त्याचे पुत्र प्रतिक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणाहून शड्डू ठोकला.
