अखेर 18 तासांनंतर भिंगारच्या गणरायांचे विसर्जन होणार! आमदार जगताप अन् पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death अखेर भिंगारच्या गणरायांचे तब्बल 18 तासांनंतर विसर्जन आमदार जगताप-पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death

Ahilyanagar Bhingar Ganesh Visarjan Death problem solved after meeting between MLA Jagtap and police : अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले होते. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वाघस्कर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर बुधवारी निघालेली भिंगारच्या गणेशोत्सव मिरवणूक विसर्जन न करताच थांबवण्यात आलेली होती. मात्र आता अखेर भिंगारच्या गणरायांचे तब्बल 18 तासांनंतर विसर्जन होणार आहे. आमदार संग्राम जगताप आणि पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा तिढा सुटला आहे.

आमदार जगताप अन् पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

या परिस्थितीमध्ये आज बुधवारी निघालेली भिंगारच्या गणेशोत्सव मिरवणूक थांबवण्यात आलेली असून विसर्जन न करताच आता आक्रमक झालेल्या आमदार संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली नगर पाथर्डी महामार्गावर रास्ता रोको सुरू केला होता. मोठ्या प्रमाणात लोक येथे जमलेले होते. त्यानंतर आमदार जगताप अन् पोलिसांची बैठक झाली. त्यामध्ये दीपक वाघस्कर मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला.

48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपी आक्रमक

घडलेल्या घटनेचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून वाघस्कर मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यात येणार असून SIT चौकशीच्या मागणीसाठीही शासनाकडे अहवाल पाठविणार आहे. कालच्या घटनेप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची अपर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रभारी अधिकारी आणि संबंधित कर्मचारी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर भिंगार बंद मागे घेण्यात आला आहे.

follow us