अहिल्यानगर भाजपमध्ये धक्कादायक प्रकार, जाहीर झालेली उमेदवारांची यादी परस्पर बदलली? अनेक चर्चांना उधाण

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून या

Ahilyanagar Municipal Corporation Election

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीत भाजप 32 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे सध्या भाजप अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. कोअर कमिटीसमोर उमेदवारांची यादी न देता यादीमधील उमेदवारांची नावे परस्पर बदलत ही यादी जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आता या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री आणि राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) भाजपने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटासोबत युती केली असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवण्यात येत आहे. भाजपने 32 जागांसाठी मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.

तसेच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप देखील करण्यात आले होते मात्र हे एबी फॉर्म पक्षाचा सदस्य नसणाऱ्या व्यक्तीकडून पोहोचविण्यात आल्याचा आरोप देखील आता करण्यात येत आहे. याचबरोबर या एबी फॉर्मवर भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची सही देखील नसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची कोअर कमिटी तयार केली होती मात्र या कोअर कमिटीमध्ये सदस्य जास्त असल्याने बैठकांची गोपनीयता राहू शकत नाही यामुळे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) , शहर जिल्हाधक्ष अनिल मोहिते, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी , सुनील रामदासी आणि बाबासाहेब सानप यांच समिती तयार करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द अन् अजितदादांचा फोन ; अमोल बालवडकरांचा धक्कादायक खुलासा

या समितीची फक्त एकच बैठक झाली असल्याची देखील चर्चा सध्या अहिल्यानगर शहरात सुरु आहे. भाजपकडून तयार करण्यात आलेल्या समितीसमोर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या. तसेच उमेदवारांंबाबत चर्चा देखील झाली मात्र प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करताना जी नावे कोअर कमिटी पुढे आली नाहीत अशा अनेक नावांचा समावेश करुन अंतिम यादी जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

follow us