Ajit Pawar यांची निवडणूक आयोगावर टीका… तर राजू पाटील यांना अख्खा ‘मनसे’ पक्ष देणार का?
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आल्यानंतरंच, आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे पक्ष आणि रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह, हे राजू त्या आमदारांच्या नावावर होऊ शकतं. छोट्या-मोठ्या कुठल्याही पक्षाबाबत हे घडू शकतं, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगासारख्या संस्थांनी त्यामुळे जबाबदारीनं निर्णय दिला पाहिजे. त्यासाठी त्याची स्वायत्तता टिकली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्याविरोधात, राज्यात जनभावना तीव्र आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर लोकभावना अधिक संतप्त आहेत. आज होत असलेल्या कसबा आणि चिंचवडच्या मतमोजणीनंतर ते दिसेलंच. आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिंदे साहेबांना आणि त्यांच्या आमदारांना असलेल्या जागा टिकवणं कठीण जाणार आहे.
Ajit Pawar : माजी मंत्र्यांला अंडरवर्ल्ड मार्फत संपविण्याची भाषा… तरीही ‘ईडी’ सरकार सुस्त!
सर्वोच्च न्यायालयातला कपिल सिब्बल साहेबांचा युक्तीवाद बघितल्यानंतर, विद्यमान शिंदे सरकार हे, बेकायदा, घटनाबाह्य सरकार असल्याचं आणि सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, हित जपण्यात गेल्या आठ-नऊ महिन्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे, असा देखील आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.