बेताल वक्तव्यावर अनेकांची सटकते पण.., Ajit Pawar विरोधकांवर भडकले

बेताल वक्तव्यावर अनेकांची सटकते पण.., Ajit Pawar विरोधकांवर भडकले

अहमदनगर : हा महाराष्ट्र फुले-शाहु-आंबेडकरांचा ही गोष्ट आत्ताचे राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे विसरले आहेत, या शेलक्या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

पवार म्हणाले, सरकार येत असतं जात, असतं ही लोकशाहीची पध्दत आहे. डॉ. बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्याचा वापर योग्य झाला पाहिजे. महाराष्ट्र संतांची भूमी असून संतांचे विचार खूप महत्वाचे आहेत. हा महाराष्ट्र शाहु फुले आंबेडकरांचा आहे, ही गोष्ट आत्ताचे राज्यकर्ते आणि त्यांचे बगलबच्चे विसरतात ते अतिशय बेताल वक्तव्य करत असल्याचं ते म्हणालेत.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. अनेकांची तर त्यांच्या वक्तव्यावर सटकते पण कायद्याविरोधात काही करता येत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्ताचं पाणीपुरवठा योजनेचं काम आमदार प्राजक्त तनपुरेंमुळेच शक्य झालंय, संधीचं सोनं करायचं असतं बेताल वक्तव्य करायचं नसतं, असा टोलाही त्यांनी यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना लगावलाय.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते राहुरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये विशेषत: पाणीपुरवठा योजनेच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आम्ही लोकांची कामे करण्यासाठी निवडून आलो आहोत. निवडून आल्यानंतर तो संपूर्ण तालुक्याचा आणि राज्याचा मंत्री असतो, असंही त्यांनी म्हंटलंय.

काही गोष्टीमध्ये माझी रोखठोक भूमिका असते, मला छक्केपंजे जमत नाहीत, जिथं चुकतंय तिथं चूक मान्य करुन पुढे जायचं, ये आज ये उद्या.., ये पुण्याला, ये मुंबईला, अशा हेलपाट्या कशाला मारायला लावायच्या, जे काम होणार आहे ते स्पष्टपणे सांगायंच असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातलं हे सरकार घटनाबाह्य आहे, सरकारबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जे जे लोकं शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, ते ते लोकं निवडणुकीत पडले असल्याचा इतिहास असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube