Ajit Pawar Plane Crash : टेबल टॉप रनवे धोकादायक का? बारामतीतील घटनेनंतर चर्चेला फुटलं तोंड
Ajit Pawar Plane Crash 1996 मध्ये बारामती येथे उभारण्यात आलेले विमानतळ हे प्रामुख्याने वैमानिक प्रशिक्षणासाठी बनवण्यात आले आहे.
Ajit Pawar Plane Crash Why Tabletop Runways Are Dangerous? : राजकारणातला दादा माणूस अजित पवार यांचं बुधवारी (दि.28) सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या अपघातानंतर सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामतीत असलेल्या टेबल टॉप रनवेची. टेबल टॉप रनवे म्हणजे नक्की काय? कोणतंही विमान अशा टेबल टॉप रनवेवर लँड करणं खरचं धोकादायक असतं का? या सर्व बारकाव्यांचा सोप्या शब्दांत घेतलेला हा आढावा…
1996 मध्ये बारामती येथे उभारण्यात आलेले विमानतळ हे प्रामुख्याने वैमानिक प्रशिक्षणासाठी बनवण्यात आले आहे. त्याशिवाय येथे व्हिआयपींचे प्रायव्हेट जेट्सदेखील उतरवले जातात. विमानतळाबद्दल बोलायचे झाले तर, समुद्रसपाटीपासून 604 मीटर उंचीवर असलेल्या या विमानतळाची धावपट्टी अंदाजे 1770 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आहे.
टेबलटॉप रनवे म्हणजे नेमके काय?
आता तुम्हाला टेबर टॉप रनवे म्हणजे काय तर, टेबलटॉप रनवे म्हणजे सपाट मैदानावर न बांधता उंच पठारावर किंवा टेकडीवर बांधलेली धावपट्टी होय. ज्याच्या एक किंवा दोन्ही टोकांना खोल उतार किंवा दरी असते. अशा रनवेवर विमान उतरवताना वैमानिकाकडे चुकीसाठी जवळजवळ शून्य जागा असते. भारतामध्ये मंगळूर, कोझिकोड (करिपूर), लेंगपुई (मिझोराम) ही टेबलटॉप रनवे असलेली विमानतळं आहेत. बारामती एअरपोर्टवरील रनवेदेखील याच प्रकारात मोडतो. पण, वर उल्लेख केलेल्या एअरपोर्टवरील सुविधा आणि बारामतीयेथील एअरपोर्टवर असलेल्या सुविधा यात जमीमआसमानचा फरक आहे. यामुळे या ठिकाणी देशात असलेल्या अन्य टेबल टॉप रनवेपेक्षा अपघाताचा धोका अधिक आहे. Ajit Pawar Plane Crash Why Tabletop Runways Are Dangerous?
बारामती एअरपोर्टवर अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव
आता हे झालं टेबल टॉप रनवेबाबत. मात्र, जेव्हा कोणतंही विमान एखाद्या एअरपोर्टवर लँड केलं जात त्यावेळी पायलटला गाईड करण्यासाठी या ठिकाणी अत्यधुनिक यंत्रणा असणं अत्यंत गरजेचं असतं. पण, बारामती एअरपोर्टवर या यंत्राणाचा नाहीये. त्यामुळे या ठिकाणी विमान लँड होण्यापूर्वी पायलटला कॉल करून क्लिअरन्स मिळाला की, लँड करता येतं. बारामतीमध्ये असणारं विमानतळ तुलनेलं छोटं असल्याने या ठिकाणी आयएलएस म्हणजेच इंन्ट्रूमेंट लँडिंग सिस्टिम नाहीये. त्यामुळे टेक्नोलॉजीशिवाय कम्युनिकेशन करतचं पायलटला येथील धावपट्टीवर विमान लँड करावं लागतं.
टेबल टॉप रनवे अन् अपघात
बारामती येथे टेबल टॉप रनवेवर घडलेला देशातला हा पहिलाच भीषण अपघात आहे का? तर, नाही. याआधी कोझिकोडच्या टेबलटॉप रनवेवरून ऑगस्ट 2020 मध्ये, एअर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग 737 घसरून 35 फूट खोल दरीत कोसळले होते. हा अपघात पावसाळ्यात आणि कमी दृश्यमानतेमुळे झाला होता. ज्यात 21 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय दशकभरापूर्वी मंगलोर येथे एअर इंडिया एक्सप्रेसचेच आणखी एक विमान उंचावरून घसरून दरीत कोसळले होते. ज्यात 158 जणांचा मृत्यू झाला होता.
बारामती येथील विमानतळ हे मुख्यतः पायलटच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाते. याआधीदेखील या ठिकाणी प्रशिक्षणावेळी अपघाताच्या घटना घडलेल्या असून, अत्याधुनिक यंत्रणा नसताना आणि कमी दृष्यमानता असतानादेखील अजित पवारांचं विमान या ठिकाणी लँड करत होते. नेमका अपघात कसा झाला हे तपासातून समोर येईलच पण, अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने टेबल टॉप रनवे लँडिगसाठी किती धोकादायक ठरू शकतात हे बारामती एअरपोर्टवरील भीषण अपघातानंतर अधोरेखित झालं आहे हे मात्र नक्की.
