अकलूज उमेदवाराच्या मुलाने दाबलं EVM चं बटण अन् संभाजीनगरमध्ये आमदार पुत्राने लावली बोटाला शाई

Zilla Parishad Election : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदार प्रक्रिया आज सकाळी 7.30 पासून सुरु झाली

  • Written By: Published:
Zilla Parishad Election

Zilla Parishad Election : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदार प्रक्रिया आज सकाळी 7.30 पासून सुरु झाली असून 09 फेब्रुवारीला कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे अकलूज येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर एक धक्कादायक घटना घडल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

अकलूज (Akluj) येथील यशवंत नगर मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील (Arjunsinh Mohite Patil) यांच्यासोबत आलेल्या एका लहान मुलाने मतदान केल्याने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या लहान मुलाने ईव्हीएम (EVM) मशीन दाबून मतदान केल्याने सध्या सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपल्या मुलाला रुद्रराज मोहिते पाटील याला मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी केंद्रात घेऊन आले होते. त्यांनी रुद्रराज मोहिते पाटील याला मतदान केंद्रावर नेले आणि ईव्हीएमसमोर उभे राहून प्रक्रिया दाखवली. यावेळी रुद्रराज मोहिते पाटीलने स्वत: बटण दाबले. यानंतर केंद्राध्यक्षांनी तात्काळ नियमांचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला. तसेच लहान मुलांना मतदान केंद्रात प्रवेश देणे आणि त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करणे हे नियमबाह्य असं म्हणत केंद्राध्यक्षांनी आक्षेप नोंदवला.

तर दुसरीकडे मुलाला लोकशाहीच्या मूलभूत हक्काची ओळख करुन देण्याच्या उद्देशाने त्याला सोबत आणले होते. आई- वडिलांच्या मतदानाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे मुलाने बटण दाबण्याची घटना घडली असल्याची प्रतिक्रिया उमेदवाार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

शितल गंभीर, तेजस्वी घोसाळकरसह ‘या’ नावांची चर्चा पण मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडेंनी मारली बाजी-

तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांच्या लहान मुलाने देखील मतदान केंद्रात जाऊन बोटाला शाई लावली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहिला मिळत असून राज्य निवडणूक आयोगाकडून या घटनेवर कारवाई करण्यात येईल का? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

follow us