Akola : जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने; घटनेच्या चौकशीचे फडणवीसांचे आदेश

  • Written By: Published:
Akola : जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने; घटनेच्या चौकशीचे फडणवीसांचे आदेश

Akola : अकोल्यात झालेल्या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj temple) काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळंच लिंबांच मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मतकार्य सुरू होतं.

Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “अकोला जिल्ह्यातील पारस या ठिकाणी झालेली घटना ही अतिशय गंभीर आणि दुर्देवी आहे.शेड वर झाड कोसळुन सात भाविकांचा मृत्यु झाला असुन ३७ लोक जखमी आहेत. या सगळ्या जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकारच्या वतीने करण्यात येईल. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांचे देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन त्यांच्या परिवाराला मदत करण्यात येईल.”

याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी एकुणच या संपुर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की “आमच्या सगळ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहे. अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत.”

राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…

मिळालेल्या माहितीनुसार बाबजी महाराज मंदिरात काल रात्री आरतीचं आयोजन केलं होतं. या रोज होणाऱ्या आरतीला मोठ्या प्रमाणावर गावकरी मंडळी उपस्थित होते. आरती सुरू असतांनाच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यामुळं मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक हे मंदिरात आले. सर्वजण मंदिरात दाटीवाटीने उभे राहुन आरती करत होते. इतक्यात मंदिरा जवळ असलेलं लिंबाचं झाड मंदिराच्या टीन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने शेड खाली आली आहे. त्यात भाविक दबले गेले. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube