संत्री खाण्याची नवी पद्धत, राजकारणातला हिरो ते चित्रपटाचे दिग्दर्शक; फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता.

Akshay Kumar Takes CM Devendra Fadnavis Interview : फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी संत्री कशी खायची ते राजकारणतला हिरो कोण आणि पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तर, सीन कोणता असेल यावर अगदी फ्री स्टाईल उत्तर दिली आहे.
संत्री खाण्याची नवी पद्धत, राजकारणातला हिरो ते चित्रपटाचे दिग्दर्शक; फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर… देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नायक फिल्ममध्ये जसं अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनतात, तसं जर तुम्हाला एक दिवसासाठी दिग्दर्शक बनवलं आणि फिल्मचं नाव महाराष्ट्र असेल, तर तुम्ही पहिला सीन काय दिग्दर्शित कराल? असा प्रश्न अक्षय कुमारं फडणवीसांना विचारला. त्यावर फडणवीसांनी दिलेलं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटेल असे उत्तर दिले. ते म्हणाले की, “जर महाराष्ट्रावर फिल्म बनत असेल तर, पहिला सीन असेल छत्रपती शिवाजी महाराज… राज्याभिषेकासाठी सिंहासनावर आरुढ झाले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचा निर्माण हाच त्या सिनेमाचा पहिला सीन असेल…” असे उत्तर फडणवीसांनी अक्षयच्या प्रश्नावर दिले.
फडणवीसांनी सांगितली संत्री खाण्याची नवी पद्धत
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंबा कसा खायला आवडतो असा प्रश्न अक्षयनं विचारला होता. या प्रश्नावरून त्यावेळी अक्षय कुमार (Akshay Kumar) मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. पण, त्यांतरही अक्षयनं आज फडणवीसांना तुम्ही नागपूरचे आहात मी तुम्हाला विचारणार आहे की, तुम्ही संत्री कशी खायला आवडतात…? असा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकताच फडणवीसांना हसू अवरले नाही. त्यामुळे ते पहिले खळखळून हसले.
त्यानंतर अक्षयच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी खिलाडी अक्षयला संत्री खाण्याची नवी पद्धत सांगितली. ते म्हणाले की, “मी तुम्हाला एक नवी पद्धत सांगतो… संत्री असतात ना, त्यांची साल न काढता, त्याचे दोन भाग करा, त्याची साल अजिबात काढू नका… आणि त्यावर मीठ घालून खा… जसा आंबा खाता तसंच ते संत्र खा… तुम्हाला खरंच एक वेगळीच फिलींग येईल संत्री खाताना… ही पद्धत फक्त नागपुरच्याच लोकांना माहीत असल्याचे फडणवीसांनी अक्षयला सांगितले.
अनिल कपूर यांच्या ‘नायक’ नं माझ्या समस्या वाढवल्या
असा कोणता सिनेमा आहे, ज्यांनं तुम्हाला राजकीय दृष्टीकोनातून भूरळ घातलीय…? त्यावर फडणवीसांना अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचे नाव घेतले.पण या चित्रपटामुळे माझ्यासाठी एवढ्या समस्या वाढवल्या. अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात एवढी कामं करतात की, मी जिथे कुठे जातो, तिथे लोक मला सांगतात की, ‘नायक’ सारखं काम करा… एका दिवसात त्यांनी किती काय-काय केलं… कसं एकाच दिवसांत त्यांनी सगळंच बदललं… असे फडणवीस म्हणाले.
कॅनडाचा नागरिक असलेला अक्षय कुमार कसा बनला अस्सल भारतीय? समजून घ्या नियम
चित्रपट बघितला की, मी एक सर्वसामान्य माणूस बनतो
तुम्हाला सिनेमा भूरळ घालतो किंवा काही शिकवतो, ते आपल्या संवेदना आणि मनाला प्रभावित करतो… तसं अनेक फिल्म्सनी मला प्रभाविक केल्याचे सांगत त्यात ‘नायक’ हा चित्रपट आघाडीवर आहे. मला एक दिवस अनिल कपूर भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुम्हा का बनवलीय नायक? तुम्ही ‘नायक’ आणि आम्ही ‘नालायक’… एकाच दिवसांत तु्म्ही एवढ्या गोष्टी कशा केल्या? मला असं वाटतं की, एक बेंचमार्क सेट करण्याचं काम त्यांनी केल्याचेही फडणवीस म्हणाले. फिल्म पाहिल्यानंतर मी एक सर्वसामान्य माणूस बनतो… जो मी कित्येक वर्षांपासून आहे…”, असेही फडणवीस म्हणाले.
मोदी राजकारणातले खरे हिरो
पुढे अक्षय कुमारने फडणवीसांना राजकारणातले खरे हिरो कोण असा थेट प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न करता एकच ना घेतलं आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. ते म्हणाले की, देशात गरिबी हटाव चा नारा सातत्याने लागला. पण 10 वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्य्र रेषेखालून वर आणण्याचं काम मोदींनी केलं. आज प्रत्येक क्षेत्रात भारत अन्य देशांशी बरोबरी करत आहे हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींमुळे शक्य झालं आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय इतिहासाचा विचार केला तर, राजकीय हिरो मला मोदी वाटतात असे फडणवीस म्हणाले.