डीजे बंद! बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयतीनिमीत्त आदर्श निर्णय

या निर्णयाने बीड जिल्ह्याचं राज्यभरात कौतूक होत आहे. तसं, असाच प्रयोग सर्वत्र झाला पाहिजे असंही बोललं जात आहे.

News Photo   2026 04 14T145527.527

बीड म्हटलं की गुन्हेगारी, गुंडागर्दी आणि मागासलेपण (Beed) अशा अनेक विचारांनी ही चर्चा होते. गेल्या दोनचार वर्षात तर बीड राज्यभर नाही देशभर गाजत आहे. परंतु, हे सगळ बीडमध्ये होत असं नाही संपूर्ण राज्यात देशात गुन्हेगारी, गु्ंडागर्दी आणि मागासलेपण कमी अधिक प्रमाणात असतं. मात्र, बीडला सर्वात जास्त चर्चेत ठेवलं गेलं नाही तशी चर्चा केली गेली असा थेट आरोप बीडच्या काही नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. आता पुन्हा एकदा बीड चर्चेत आलं आहे. परंतु, ते कुठल्या गुन्हेगारीमुळं किंवा बदनामीमुळे नाही तर एका आदर्श वाटाव्या अशा निर्णयामळे. काय आहे हा निर्णय पाहूया…

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहात आणि विचारांनी ही जयंती साजरी होत आहे. दरम्यान, बीडमध्ये गेली अनेक वर्षांपासून आंबेडकर यांच्या जयंतिनीमीत्ताने मोठे मोठे डीजे वाजत असंत. ध्वनीप्रदुषणासह कर्कश आवाजाने अनेकांना मोठ्या त्रासाला सामोर जावा लागत असे. परंतु, यंदा बीड प्रशासनाने आदर्शवत निर्णय घेतला तो डीजेमुक्त जयंती साजरी करण्याचा. आणि प्रशासनाच्या या निर्णयाला कसलाही विरोध न होता सर्वांनी डीजेमुक्त जयंतीच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यामुळे बीडमध्येही चांगले निर्णय आणि चांगले लोक आहेत अशी चर्चा सुरू झाली.

बीडमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची स्पर्धा ! दोन वर्षांत सव्वाशे अनधिकृत पुतळे उभारले

पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत डीजे न वापरण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेऊन पारंपरिक वाद्यांचा वापर करून जयंती उत्सव साजरी करण्याचं आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हालगी, ढोल, ताशा, पिपाणी, हालगी, संबुळ, बँन्ड अशा पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशा सुचनाही प्रशासनाने केल्या आहेत. दरम्यान, याच पारंपारिक वाद्यांच्या तालावर बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर थिरकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरलं झाला आहे.

रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही विचारांची जयंती आहे, ती केवळ जल्लोषापुरती मर्यादित राहू नये. त्यामुळे यंदा डीजेचा कर्कश आवाज टाळून शिस्त, प्रबोधन आणि सामाजिक संदेशाला प्राधान्य दिले जाईल. तसंच, मिरवणुकीत समाजप्रबोधन करणारे विविध देखावे सादर करणाऱ्या मंडळांना सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल असं सांगतं डीजे आता हद्दपार करून पारंपारीक वाद्याच्या आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाईल असं सांगितल. या निर्णयाने बीड जिल्ह्याचं राज्यभरात कौतूक होत आहे.

follow us