शाह-शिंदेंना ढगाळ हवामानाचा फटका! हेलिकॉप्टर रद्द; बाय रोड मुंबईकडे रवाना

शाह-शिंदेंना ढगाळ हवामानाचा फटका! हेलिकॉप्टर रद्द; बाय रोड मुंबईकडे रवाना

Mumbai Rain : आज लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. तसंच, राज्यभर नेत्यांच्या सभा देखील सुरु आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. (Mumbai Rain) धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. त्यानंतर पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली.

 

वायरवर खांब कोसळला

पावसाने दादर घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलीये. या अवकाळी वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसानंतर मुंबई मेट्रो ठप्प झाली आहे. काही ठिकाणी पत्रे उडून गेले तर वडाळा येथील पार्किंग टॉवर कोसळला आहे. मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला तर विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. या ढगाळ हवामानाचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील बसला आहे.

 

शिंदे अन् शाह बाय रोड मुंबईकडे रवाना

मुंबईत अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं. मुंबईत सोसाट्याचा वारा सुटून जोरदार पावसाला सुरुवात झाली. या खराब वातावरणाचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. अमित शाह आणि एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे मुंबई विमानतळावर पोहोचणार होते. मात्र, खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून दोघेही रस्ते मार्गाने मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज