Sharad Pawar यांना धमकी देणारा पिंपळकर गुन्हेगारच; अमरावती पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या तरूणाने ट्विटरवरून ही धमकी दिली आहे. त्यामुळ राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान आता या तरूणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं असून अमरावती पोलिसांनी त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती दिली आहे. ( Amravati Police gave information of Saurabh Pimpalkar who gave Death Threat Sharad Pawar)
हा तरूण अमरावतीतील गोपाल नगर भागात राहणारा आहे. त्याच्याबद्दल आणखी माहिती घेत आहोत. तसेच अमरावती पोलीस त्याच्या हालचालींवर सायबर क्राईमच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर तो इतर गुन्ह्यांमध्येही अटकेत होता. अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.
पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता? वाचा अजितदादा काय म्हणाले
दरम्यान सौरभ पिंपळकर या तरूणाने ट्विटरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘तुमचाही दाभोलकर होणार’ अशी धमकी त्याने दिली आहे. या तरूणाच्या ट्विटर बायोमध्ये आपण भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्याने या बायोमध्ये असं देखील म्हटलं आहे. ‘मी भाजप कार्यकर्ता आहे आणि मी धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार करतो.’ त्यामुळे आता भाजपवर यावरून चांगलीच टीका-टीपण्णी सुरू झाली आहे.
Devendra Fadnavis : धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांचा इशारा
या तरूणाच्या ट्विटर अकाऊंटर सर्व भाजप समर्थनाच्या पोस्ट अपलोड करण्यात आलेल्या आहेत. तसेच विरोधकांवर टीका करणाऱ्या पोस्ट देखील या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या आहेत. मात्र हा तरूण खरचं भाजपचा कार्यकर्ता आहे का? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या तरूणाने ट्विटरवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, एका ट्विटर अकाऊंटवरून शरद पवरांना तुमचाही दाभोलकर होणार, असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. जर काही झालं तर त्याला फक्त देशाचं व राज्याचं गृहखातं जबाबदार असेल असे सुळे म्हणाल्या. काही बरं वाईट झालं तर केंद्रीय गृहखातं जबाबदार असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला आहे.
दुसरीकडे या प्रकरणार राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी शरद पवारांना आलेल्या धमकीवर देखील भाष्य केले. तुमचाही दाभोळकर होणार अशी पवार साहेबांना धमकी दिली असून सौरभ पिंपळकर याने ट्विट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याच्या ट्विटरच्या बायोमध्ये भाजप कार्यकर्ता असा उल्लेख आहे. तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का ते माहित नाही.
विचारांची लढाई विचारांनी करुया. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर कशाला करताय. राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष दिले पाहिजे. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे. त्याचा मोबाईल फोन काढून त्याचा कुणाशी संपर्क आला ते पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला पण ते 2 दिवस उपलब्ध नाहीत. यानंतर मी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.